Home /News /sport /

T20 World Cup: मॅक्सवेलला भारी पडली विराटची मैत्री, भारताविरुद्ध झाली फजिती VIDEO

T20 World Cup: मॅक्सवेलला भारी पडली विराटची मैत्री, भारताविरुद्ध झाली फजिती VIDEO

Video Screenshot

Video Screenshot

ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित ओव्हर्समध्ये 5 आऊट 152 रन केले होते. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर आणखी झाला असता, पण सेट झालेल्या ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) विराट कोहली (Virat Kohli) सोबतची मैत्री महाग पडली.

  मुंबई, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) पूर्वी झालेल्या दोन्ही वॉर्म अप मॅचमध्ये टीम इंडियानं सहज विजय मिळवला आहे. इंग्लंडला सोमवारी 7 विकेट्सनं पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी झालेल्या दुसऱ्या मॅचमध्येही भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 8 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित ओव्हर्समध्ये 5 आऊट 152 रन केले होते. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर आणखी झाला असता, पण सेट झालेल्या ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) विराट कोहली (Virat Kohli) सोबतची मैत्री महाग पडली. राहुल चहरच्या (Rahul Chahar) 12 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर फोर लगावत मॅक्सवेलनं चहरचं स्वागत केलं. त्यानंतर विराटनं चहरशी चर्चा केली आणि त्याला योग्य बॉलिंगचा कानमंत्र दिला. विराटशी चर्चेनंतर चहरनं त्याचा बॉलिंग प्लॅन बदलला. त्यानंतर त्यानं सलग तीन बॉल डॉट टाकले आणि ओव्हरच्या पाचव्या बॉलला मॅक्सवेलला आऊट केलं. मॅक्सवेलनं आऊट होण्यापूर्वी 28 बॉलमध्ये 5 फोरच्या मदतीनं 37 रन काढले होते. चहरनं मॅचमधील निर्णायक क्षणी मॅक्सवेलला आऊट करत ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला ब्रेक लावला.
  View this post on Instagram

  A post shared by ICC (@icc)

  विराट आणि मॅक्सवेल हे दोघंही नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचे सदस्य होते.  मॅक्सवेलनं या आयपीएल सिझनमधील 15 मॅचमध्ये 42.75 च्या सरासरीनं 513 रन काढले. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. आरसीबीच्या नेट सेशनमध्ये विराट आणि मॅक्सवेलनं एकत्र बरीच बॅटींग केली आहे. त्याचाच फायदा विराटला झाला. त्यानं राहुल चहरला मॅक्सवेलला रोखण्याचा उपाय सांगितला. विराट कोहलीनं केली 5 वर्षांनी बॉलिंग, स्मिथला आवरलं नाही हसू VIDEO ऑस्ट्रेलियानं दिलेलं 153 रनचं आव्हान भारताने 9 विकेट राखून पार केलं. रोहित शर्मा 41 बॉलमध्ये 60 रन करून रिटायर्ड हर्ट झाला, तर केएल राहुलने 39 रन केले. सूर्यकुमार यादव 38 रनवर आणि हार्दिक पांड्या 14 रनवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून फक्त एश्टन अगरला एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 17.5 ओव्हरमध्येच केला.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Glenn maxwell, India vs Australia, T20 world cup, Virat kohli

  पुढील बातम्या