Home /News /sport /

T20 World Cup: विराट कोहलीनं केली 5 वर्षांनी बॉलिंग, स्मिथला आवरलं नाही हसू VIDEO

T20 World Cup: विराट कोहलीनं केली 5 वर्षांनी बॉलिंग, स्मिथला आवरलं नाही हसू VIDEO

विराट कोहलीची बॉलिंग हे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचचं वैशिष्टय ठरलं. (Pic - Video Screenshot/AP)

विराट कोहलीची बॉलिंग हे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचचं वैशिष्टय ठरलं. (Pic - Video Screenshot/AP)

टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) दुसऱ्या वॉर्म-अप मॅचमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 8 विकेट्सनं पराभव केला. केलं. विराट कोहलीनं (Virat Kohli) केलेली बॉलिंग हे या मॅचचं वैशिष्ट्य ठरलं.

    मुंबई, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) दुसऱ्या वॉर्म-अप मॅचमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 8 विकेट्सनं पराभव केला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित ओव्हर्समध्ये 5 आऊट 152 रन केले. टीम इंडियानं 153 रनचं लक्ष्य 13 बॉल राखून आणि 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विराट कोहलीनं (Virat Kohli) केलेली बॉलिंग हे या मॅचचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 2 ओव्हर बॉलिंग केली आणि त्यामध्ये 12 रन दिले. टीम इंडियाच्या कॅप्टननं तब्बल 5 वर्षांनी टी20 क्रिकेटमध्ये बॉलिंग केली. यापूर्वी त्यानं 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिडविरुद्ध बॉलिंग केली होती. तर एकूण क्रिकेटचा विचार केला तर मागच्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये त्यानं बॉलिंग केली होती. विराट मॅचच्या सातव्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॉलिंगला आला. त्यावेळी स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) क्रिजवर होता. तो विराटची बॉलिंग एक्शन पाहून हसू लागला. त्यानं विराटच्या बॉलिंग एक्शनची नक्कलही केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटनं बॉलिंग का केली? हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे टीम इंडियाला सहाव्या बॉलरची चिंता भेडसावत आहे. रोहित शर्माने टॉसवेळीही सहावा बॉलर गरजेचा असल्याचं सांगितलं. 'आम्हाला बॉलिंगसाठी सहावा पर्याय हवा आहे. हार्दिक फिट होत आहे, पण त्याला बॉलिंगसाठी तयार व्हायला वेळ लागेल. त्याने बॉलिंगला सुरुवात केलेली नाही, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधी तो बॉलिंगला सुरुवात करेल. आमची बॉलिंग उत्कृष्ट आहे, पण तुम्हाला पर्याय म्हणून सहावा बॉलर गरजेचा आहे,' असं रोहित शर्मा म्हणाला. T20 World Cup: अश्विननं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, विराटला घ्यावी लागणार धोनीची मदत विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दोन ओव्हर बॉलिंग केली, यात त्याने 12 रन दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. एमएस धोनी मेंटर आणि रोहित शर्मा कॅप्टन होताच टीम इंडियाच्या रणनितीमधला हा बदल पाहायला मिळाला. विराट कोहली बहुतेकवेळा पाच बॉलर घेऊन खेळण्यासाठी उत्सुक असतो, पण रोहित शर्मा आणि एमएस धोनी बॉलिंगला जास्त पर्याय घेऊन खेळतात. एमएस धोनी कॅप्टन असतानाही तो युवराज, सेहवाग, सचिन यांच्याकडून बॉलिंग करून घेत असे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: T20 world cup, Video viral, Virat kohli

    पुढील बातम्या