• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs AFG Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IND vs AFG Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात बुधवारी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचा (T20 World Cup 2021) 33 वा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात बुधवारी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचा  (T20 World Cup 2021) 33 वा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचा पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सनं तर न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सनं पराभव झाला आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे बॅटर्स आणि बॉलर्स दोन्हीही अयशस्वी ठरले आहेत. या मॅचमध्ये टीम इंडियाची छोटी चूक देखील त्यांना स्पर्धेतून बाहेर करू शकते. दुसरिकडं अफगाणिस्तान टीमनं या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. 3 मॅचमध्ये 2 विजयासह ही टीम ग्रुपमध्ये नंबर 2 वर असून सेमी फायनलची प्रबळ दावेदार आहे. गेल्या दोन मॅचमधील टीम इंडियाच्या प्लेईंग 11 वर (Team India Playing11) सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहे. या पिढीतील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या आर. अश्विनला या स्पर्धेत संधी मिळालेली नाही. यापूर्वी तो इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही बेंचवर होता. अश्विनचा प्लेईंग 11 मध्ये समावेश न केल्यामुळे विराट कोहलीवर जोरदार टीका होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यासमोर खडतर आव्हान आहे. 2 खराब मॅचनंतर राहुलही पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहे. तर पूर्ण फिट झाल्यानं सूर्यकुमार यादवला टीममध्ये संधी मिळू शकते. IND vs AFG: अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर जोशात, टीम इंडियाला हरवण्याचा केला दावा! Dream11 Team Prediction: कॅप्टन : इशान किशन व्हाईस कॅप्टन : मोहम्मद नबी विकेट किपर: ऋषभ पंत बॅटर्स: रोहित शर्मा, केएल राहुल, हजरतुल्लाह जजई ऑल राऊंडर्स: रविंद्र जडेजा, मोहम्मद नबी बॉलर्स: सप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, राशिद खान, नविन उल हक भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी अफगाणिस्तानची टीम: मोहम्मद नबी (कॅप्टन), अहमद शहजाद, हरजतउल्लाह जजाई, रहमानुल्‍लाह गुरबाज,  नजीबुल्‍लाह जदरान, राशिद खान, गुलबदीन नईब, नवीन उल हक, मुजीब उर रहमान, करीम जनत, फरीद अहमद, हमीद हसन, शराफुद्दीन अशरफ, उस्मान घानी आणि हसमतउल्लाह शाहिदी
  Published by:News18 Desk
  First published: