• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया अडचणीत, आता चुकीला माफी नाही!

India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया अडचणीत, आता चुकीला माफी नाही!

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचं सर्व समीकरण बिघडलं आहे. या पराभवामुळे टीम इंडियाची सेमी फायनलची वाट अवघड झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचं सर्व समीकरण बिघडलं आहे. या पराभवामुळे टीम इंडियाची सेमी फायनलची वाट अवघड झाली आहे. मोठ्या स्पर्धेत एखादी कमकुवत वाटणारी टीम देखील बड्या टीमना पराभवाचा धक्का देऊ शकते. त्यामुळे टीम इंडियाला आता प्रत्येक मॅचमध्ये चांगलाच घाम गाळावा लागेल. टीम इंडिया या वर्ल्ड कपच्या ग्रुप 2 मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान यांच्याशिवाय अफगाणिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नामिबीया या 6 टीम आहेत. यापैकी टॉप 2 टीम सेमी फायनलमध्ये जातील. याचाच अर्थ सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक टीमला 4 ते 5 मॅच जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रनरेटचा मुद्दाही निर्णायक ठरु शकतो. टीम इंडियाची पुढची मॅच रविवारी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी लढत होईल. या दोन मॅचनंतर पात्रता फेरीतून पुढे क्वालिफाय करणाऱ्या स्कॉटलंड आणि नामिबिया या दोन टीमशी सामना होणार आहे. टीम इंडियाला स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध सहज विजय मिळू शकतो. मात्र अन्य दोन मॅचमधील विजय सोपा नाही. टीम इंडियासाठी खडतर मार्ग टीम इंडियाला आता उर्वरित सर्व मॅच मोठ्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. या ग्रुपमध्ये अफगाणिस्तानसह एकूण 4 तगड्या टीम आहेत. यापैकी दोन टीम सेमी फायनलपूर्वी आऊट होतील. ग्रुप 2 मध्ये सध्या पाकिस्तानची टीम 2 पॉईंटसह टॉपवर आहे. 10 विकेटनं पराभूत झाल्यानं टीम इंडियाचा रनरेट -0.973 आहे. त्यामुळे आगामी मॅचमध्ये हा रनरेट देखील सुधारावा लागेल. India vs Pakistan: संतापजनक! टीम इंडियाच्या पराभवानंतर शमीवर झाले फिक्सिंगचे आरोप 2016 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाला पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडकडून मोठा पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतरही टीमनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. हे उदाहरण लक्षात ठेवून आता प्रत्येक मॅचचं व्यस्थित प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंगनुसार खेळ केला तर सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवणे शक्य आहे.
  Published by:News18 Desk
  First published: