• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी धोनीला मिळाली खराब खेळण्याची ऑफर! VIDEO

India vs Pakistan: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी धोनीला मिळाली खराब खेळण्याची ऑफर! VIDEO

शनिवारी (23 ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि बॅटर केएल राहुल (KL Rahul) दिसत आहे. त्यावेळी त्यांना खराब खेळण्याची ऑफर मिळाली.

 • Share this:
  दुबई, 24 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये (India vs Pakistan) आपलीच टीम जिंकावी यासाठी दोन्ही देशाचे फॅन्स सध्या प्रार्थना करत आहेत. 1992 पासून प्रत्येक वेळी टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला आहे. आता यंदा तरी पराभवाची मालिका तुटू दे अशी प्रार्थना पाकिस्तानचे फॅन्स करत आहेत. भारत- पाकिस्तान मॅचच्या काही तास आधी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये पाकिस्तानच्या फॅन्सनी मॅच हरण्यासाठी धोनीला विनंती केली आहे. शनिवारी (23 ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि बॅटर केएल राहुल (KL Rahul) दिसत आहे. टीम इंडियाची प्रॅक्टीस संपवून हे दोघं परतत असताना पाकिस्तानची एंकर सवेरा पासा तिथं ते दृश्य घेत होती. तिनं राहुलला पाहताच 'प्लीज उद्या चांगलं खेळू नकोस', अशी मजेत विनंती केली. राहुलनं तिच्या या विनंतीवर काहीही उत्तर दिलं नाही. त्यानंतर तिनं धोनीलाही तीच विनंती केली. त्यावर धोनी राहुल प्रमाणे गप्प बसला नाही. 'हेच तर माझं काम आहे.' असं सरळ उत्तर धोनीनं सवेराला दिलं. धोनी जास्त काही बोलला नसला तरी त्याचा इशारा पाकिस्तानकडं होता. पाकिस्तानला हरवणे गेच माझं काम आहे, असं धोनीनं यातून स्पष्ट केलं आहे.  या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. या मॅचसाठी 12 सदस्यांची टीम पाकिस्ताननं जाहीर केली असून यामध्ये शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज या दोन्ही अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर, टीम इंडियाची टीम टॉसपूर्वीच जाहीर करणार असल्याचं कॅप्टन विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे. IND vs PAK : 24 तास आधीच पाकिस्ताननं जाहीर केली टीम, पाहा कुणाला मिळाली संधी
  Published by:News18 Desk
  First published: