• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचे पडसाद, संतप्त फॅन्सनी फोडले TV, VIDEO VIRAL

India vs Pakistan: पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचे पडसाद, संतप्त फॅन्सनी फोडले TV, VIDEO VIRAL

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच पाहण्यासाठी या फॅन्सनी जोरदार तयारी केली होती. सर्वजण टीम इंडियाच्या विजयाची प्रार्थना करत होते. मॅच संपल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी टीव्हीची तोडफोड केली.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: क्रिकेट वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्ताननं टीम इंडियाचा (India vs Pakistan) पराभव केला.  दुबईमध्ये रविवारी झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये (T20 World Cup 2021) भारतीय क्रिकेट टीमचा 10 विकेट्सनं मोठा पराभव झाला. या पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. काही क्रिकेट फॅन्सनी हा पराभव सहन न झाल्यानं टीव्हीची तोडफोड केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. बिहारमधल्या (Bihar) फारसबिजंगमधील हा व्हिडीओ असल्याचं वृत्त आहे. फरसबिजंगमधील छोआपट्टी भागातील नागरिकांनी या मॅचची जोरदार तयारी केली होती. काही ठिकाणी प्रोजेक्टर लावण्यात आले होते. तर अनेकांनी टीव्ही सेटवर मॅच पाहणे पसंत केले. हे सर्व जण टीम इंडियानं मॅच जिंकावी म्हणून प्रार्थना करत होते. मात्र मॅचचा निकाल याच्या उलट लागल्यानं क्रिकेट फॅन्सना रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही. टीव्हीवर मॅच पाहणाऱ्या क्रिकेट फॅन्सनी रागानं टीव्ही फोडून टाकले. त्यांनी जमिनीवर आदळआपट करत टीव्ही फोडले. क्रिकेट फॅन्सच्या रागाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करताना 7 आऊट 151 रन केले. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रुपात भारताला पहिले दोन धक्के दिले, यानंतर हसन अलीने सूर्यकुमार यादवला आऊट केलं. पण विराटने ऋषभ पंतच्या मदतीने भारताच्या इनिंगला आकार दिला. ऋषभ पंतने 30 बॉलमध्ये 39 रन केले. विराट कोहली 49 बॉलमध्ये 57 रन करून आऊट झाला. शाहिन आफ्रिदीने 4 ओव्हरमध्ये 31 रन देऊन तीन विकेट घेतल्या. आफ्रिदीने रोहित, राहुल आणि विराटला आऊट केलं, तर हसन अलीला 2 विकेट घेण्यात यश आलं. India vs Pakistan: संतापजनक! टीम इंडियाच्या पराभवानंतर शमीवर झाले फिक्सिंगचे आरोप
  Published by:News18 Desk
  First published: