Home /News /sport /

T20 World Cup IND vs NZ: 'करो वा मरो' मॅचपूर्वी टीम इंडियानं केली प्रॅक्टीस रद्द, कारण वाचून बसेल धक्का

T20 World Cup IND vs NZ: 'करो वा मरो' मॅचपूर्वी टीम इंडियानं केली प्रॅक्टीस रद्द, कारण वाचून बसेल धक्का

टीम इंडियाला रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणारी मॅच (India vs New Zealand) कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या मॅचपूर्वी भारतीय टीमनं शुक्रवारी प्रॅक्टीस सेशन रद्द (Team India Cancelled Practice session) केलं.

पुढे वाचा ...
  दुबई, 30 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रविवारी मोठी मॅच होणार आहे. सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या मॅचपूर्वी भारतीय टीमनं शुक्रवारी प्रॅक्टीस सेशन रद्द  (Team India Cancelled Practice session) केलं. हे सेशन रद्द झाल्यानं मेंटॉर महेंद्रसिंह धोनीसह (MS Dhoni) अनेक भारतीय खेळाडू बीचवर व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले. हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) फिटनेस टेस्ट शुक्रवारी होणार होती. त्यामध्ये तो पास झाला तर त्याच्या न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याबाबत निर्णय होणार होता. आता हा सर्व निर्णय शनिवारी होणार आहे. का झालं सेशन रद्द? टीम इंडियाचं प्रॅक्टीस सेशन रद्द होण्याचं कारण धक्कादायक आहे. भारतीय टीम टी20 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून दुबईमधील आयसीसी अकादमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. रविवारी दुबईमध्येच त्यांची न्यूझीलंडविरुद्ध लढत होणार आहे. टीम इंडिया शुक्रवारी देखील आयसीसीच्या ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रॅक्टीस करणार होती. मात्र ऐनवेळी ट्रेनिंगचं स्थळ दुबईतून बदलून अबू धाबी करण्यात आले.
  दुबई ते अबू धाबी अंतर 2 तास आहे. त्यामुळे येण्याजाण्याच्या प्रवासातच 4 तास लागले असते. त्यामुळे भारतीय टीमनं शुक्रवारचं अभ्यास सत्र रद्द केलं आणि काही खेळाडू बीच व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेले. तर काही जणांनी हॉटेलमध्येच विश्रांती घेतली. आयसीसीच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेची सुरूवात यजमान BCCI आणि संयुक्त अमिरात क्रिकेट बोर्डाची आहे. त्यांनाच हे वेळापत्रक तयार करायचं होतं. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. PAK vs AFG: क्रिकेट फॅन्समध्ये जोरदार मारामारी, लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडवले! पाहा VIDEO टीम इंडियाचा पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सनं पराभव झाला होता. पाकिस्ताननं सलग तीन मॅच जिंकून ग्रुप 2 मध्ये टॉपवर आहे. तर अफगाणिस्तानची टीम 2 पैकी 1 मॅच जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. या परिस्थितीमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लढत 'करो वा मरो' स्वरुपाची आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: New zealand, T20 world cup, Team india

  पुढील बातम्या