मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup, IND vs NZ: गावसकारांनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला, टीम इंडियात सुचवले 2 बदल

T20 World Cup, IND vs NZ: गावसकारांनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला, टीम इंडियात सुचवले 2 बदल

भारतीय टीमची पुढची लढत न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवारी होणार आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या मॅचसाठी विजयाचा फॉर्म्युला कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) सांगितला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर (India vs Pakistan) टीम इंडियाची टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) वाटचाल खडतर झाली आहे. भारतीय क्रिकेट टीमला आता प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. भारतीय टीमची पुढची लढत न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवारी होणार आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या मॅचसाठी विजयाचा फॉर्म्युला कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) सांगितला आहे. भारताला न्यूझीलंडला पराभूत करायचं असेल तर प्लेईंग 11 मध्ये 2 बदल करणे आवश्यक आहे, असं गावसकरांनी सांगितलं आहे. सध्या फॉर्मात असलेल्या इशान किशनचा (Ishan Kishan) फिनिशर म्हणून टीममध्ये समावेश करावा आणि भुवेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) प्लेईंग 11 मध्ये संधी द्यावी असा सल्ला गावसकरांनी दिला आहे. गावसकरांनी 'स्पोर्ट्स तक' वर बोलताना सांगितलं की, 'हार्दिक पांड्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे बॉलिंग करु शकत नसेल तर त्याचा पर्याय म्हणून इशान किशनचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. प्रॅक्टीस मॅचमध्येही त्यानं चांगली बॅटींग केली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध त्याला संधी मिळू शकते. T20 World Cup: हार्दिक पांड्याला परत पाठवण्याचा झाला होता निर्णय, टीम इंडियातील दिग्गजानं वाचवलं हार्दिकनं बॅटींगमध्येही अलिकडच्या काळात फारशी कमाल केलेली नाही. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये तो 11 रन काढून आऊट झाला. तर इशान किशननं इंग्लंड विरुद्धच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये 46 बॉलमध्ये नाबाद 70 रन काढले होते. या खेळीत त्यानं 7 फोर आणि 3 सिक्स लगावले होते. आयपीएल 2021 मधील मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या 2 मॅचमध्येही इशाननं अर्धशतक झळकावले होते. भुवनेश्वर कुमारही टी20 वर्ल्ड कपमध्ये बेरंग दिसला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मॅचमध्येही तो प्रभावशाली वाटला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं 27 रन देऊन 1 विकेट घेतली. तर इंग्लंड विरुद्ध 54 रन दिले होते. टी20 वर्ल्ड कपपूर्वी यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्येही त्यानं 6 मॅचमध्ये फक्त 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे भुवनेश्वरच्या जागी शार्दुलचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sunil gavaskar, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या