मुंबई, 1 नोव्हेंबर: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) पराभूत झाल्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय क्रिकेट टीमच्या खेळावर फॅन्स तसंच माजी क्रिकेटपटू नाराज झाले आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियानं बॅटींग ऑर्डरमध्ये मोठे बदल केले. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये न खेळलेला इशान किशन (Ishan Kishan) ओपनिंगला खेळला. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 3 आणि विराट कोहली 4 नंबरवर खेळला. टीम इंडियाचाच नाही तर जागतिक टी20 क्रिकेटमधील यशस्वी ओपनर असलेल्या रोहितला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याबाबत भारतीय टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'इशान किशन हा हिट किंवा मिस खेळाडू आहे. त्याच्या पद्धतीचा बॅटर 4 किंवा 5 नंबरवर चांगला ठरला असता. तो तिथं परिस्थितीनुसार खेळू शकतो. आता रोहित शर्मावर विश्वास दाखण्यात आला नाही. तो डावखुरा फास्ट बॉलर ट्रेंट बोल्टला चांगलं खेळेल यावर विश्वास नव्हता. तुम्ही या पद्धतीनं त्या खेळाडूला वागणूक देत असाल तर त्याचाही स्वत:च्या क्षमतेवरचा विश्वास कमी होईल.
इशाननं 70 रन काढले असते तर आपण त्याचं कौतुक केलं असतं. पण रणनीती चुकली असेल तुम्हाला टीका सहन करावी लागेल. हे अपयशाच्या भीतीमधून झालं का हे माहिती नाही, पण त्यांनी बॅटींग ऑर्डरमध्ये चेंज केले आणि ते चेंज यशस्वी झाले नाहीत.' असं गावसकरांनी स्पष्ट केलं.
IND vs NZ: विराट कोहलीचं आठवभरात बदललं मत, जुन्या वक्तव्यावरून घुमजाव
टीम मॅनेजमेंटनं न्यूझीलंड इशानला टॉप ऑर्डरमध्ये खेळवण्यासाठी रोहितला तीन नंबरवर खेळण्याचा आश्चर्यजनक निर्णय घेतला. रोहित 14 बॉलमध्ये 14 रन काढून आऊट झाला. त्यामुळे मिडल ऑर्डरवरील दबाव आणखी वाढला. रोहितचा ओपनर म्हणून दमदार रेकॉर्ड आहे. त्यानं 113 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचपैकी 80 मॅचमध्ये ओपनिंग केली आहे. त्यामध्ये त्यानं 2404 रन केले असून टी20 क्रिकेटमध्ये 4 शतकही झळकावली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Sunil gavaskar, T20 world cup