• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: डाव्या पायाला दोन बोटं असलेला न्यूझीलंडचा जिगरबाज, टीम इंडियाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज

IND vs NZ: डाव्या पायाला दोन बोटं असलेला न्यूझीलंडचा जिगरबाज, टीम इंडियाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज

एखाद्या व्यक्तीनं लहानपणी पायाची तीन बोटं गमावली आणि तरीही त्यानं आयुष्यात यशाची अनेक शिखरं सर केली असतील तर ते एक आश्चर्यापेक्षा कमी नाही. न्यूझीलंडच्या या जिगरबाज खेळाडूकडून (India vs New Zealand) टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर: एखाद्या व्यक्तीनं लहानपणी पायाची तीन बोटं गमावली आणि तरीही त्यानं आयुष्यात यशाची अनेक शिखरं सर केली असतील तर ते एक आश्चर्यापेक्षा कमी नाही. त्या व्यक्तीची इच्छाशक्ती, जिद्द आणि कष्ट हे अनेकांना प्रेरणा देणारे आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) एक असाच खेळाडू त्याच्या टीमला जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहे. या खेळाडूनं त्या देशाकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन काढले आहेत. आता टीम इंडियाला रविवारच्या मॅचमध्ये त्याच्यापासून सज्ज राहावं लागेल. भारतीय क्रिकेट टीमला 'करो वा मरो' मॅचमध्ये धोकादायक ठरु शकणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे मार्टीन गप्टील (Martin Guptill). न्यूझीलंडच्या या आक्रमक ओपनरला आपण सातत्यानं रन करताना तसंच चपळ फिल्डिंग करताना पाहिलं आहे. क्रिकेटच्या मैदानावरील चपळ खेळाडूंपैकी एक असलेल्या गप्टीलच्या डाव्या पायाला फक्त दोन बोटं आहेत. का आहेत 2 बोटं? मार्टीन गप्टील 13 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या डाव्या पायाच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, पण मार्टीनचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या पायाची तीन बोट त्यांना कापावी लागली.  या  घटनेचा मार्टीनला मोठा धक्का बसला होता. त्याला पळतानाही त्रास होत असे. पण त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला यामध्ये साथ दिली आणि तो हळहळू पुन्हा एकदा फिट झाला. डाव्या पायाला दोनच बोटं असल्यानं  'मार्टी टू टोज' (Marty Two Toes) असेही त्याचे नाव आहे. IND vs NZ: विराट कोहलीची कॅप्टनसी पणाला, न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलण्याचं आव्हान दुखापतीनंतर सज्ज मार्टीन गप्टीलला  पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी हारिस राऊफने (Harris Rauf) टाकलेला बॉल अंगठ्याला लागला होता. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता.  पण तो आता फिट असून टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती न्यूझीलंड टीमचे कोच गॅरी स्टीड यांनी दिली आहे. फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यापाठोपाठ मार्टीन गप्टीलही दुखापतग्रस्त झाल्यानं न्यूझीलंडच्या टीममध्ये काळजीचं वातावरण होतं. पण, तो आता परतल्यानं न्यूझीलंडला मोठा दिलासा मिळाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: