• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup, IND vs NZ: न्यूझीलंडवरील ऐतिहासिक विजयासाठी 5 फॅक्टर ठरणार टीम इंडियासाठी निर्णयाक

T20 World Cup, IND vs NZ: न्यूझीलंडवरील ऐतिहासिक विजयासाठी 5 फॅक्टर ठरणार टीम इंडियासाठी निर्णयाक

आयसीसी स्पर्धेत गेल्या 18 वर्षांमध्ये एकदाही भारतीय क्रिकेट टीमला न्यूझीलंडला (India a vs New Zealand) हरवता आलेलं नाही. रविवारच्या मॅचमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी 5 फॅक्टर टीम इंडियासाठी निर्णायक ठरतील.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) ही टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी होणारी मॅच दोन्ही टीमसाठी 'करो वा मरो' स्वरुपाची आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी ही मॅच जिंकणे दोन्ही टीमसाठी आवश्यक आहे. आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा पेपर टीम इंडियासाठी नेहमीच अवघड गेला आहे. या स्पर्धेत गेल्या 18 वर्षांमध्ये एकदाही भारतीय क्रिकेट टीमला न्यूझीलंडला हरवता आलेलं नाही. रविवारच्या मॅचमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी 5 फॅक्टर टीम इंडियासाठी निर्णायक ठरतील. टॉस जिंकला तर अर्धे काम सोपे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुबईमध्ये मॅच होणार आहे. याच मैदानावर पाकिस्ताननं टीम इंडियाचा पराभव केला होता.  दुबईतील मैदानावर टॉस हा महत्त्वाचा घटक आहे. या टी20 वर्ल्ड कपमध्ये दुबईत आत्तापर्यंत 10 मॅच झाल्या आहेत. या प्रत्येक मॅचमध्ये दुसऱ्यांदा बॅटींग करणारी टीम मॅच जिंकली आहे. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या टीमच्या कॅप्टनची इथं पहिल्यांदा फिल्डिंग घेण्यास सर्वाधिक पसंती आहे. मैदानात रात्री पडणाऱ्या दवचा फायदा दुसऱ्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमला होत आहे. विराट कोहलीनं टॉस जिंकला तर टीम इंडियाचे अर्धे काम सोपे होईल. ओपनर्सवर जबाबदारी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचे ओपनर फ्लॉप ठरले होते. न्यूझीलंड विरुद्ध ही चूक सुधारली तर टीम इंडियाचं काम सोपं होईल. रोहित शर्मानं मोठा स्कोअर करणे आवश्यक आहे. रोहित जास्त वेळ खेळला तर बॉलर्सवरचा दबान वाढेल. त्याचा फायदा टीम इंडियाला होईल. सुरवातीला यश भारतीय बॉलर्सना न्यूझीलंड विरुद्ध सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट्स घ्याव्या लागतील. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये बॉलर्स अपयशी ठरले आणि त्यामुळे मॅच हातामधून निसटली. आता न्यूझीलंड विरुद्ध भारतीय बॉलर्सना अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग करणे आवश्यक आहे. स्पिनर्स निर्णायक स्पिन बॉलिंग ही टीम इंडियाची मोठी शक्ती आहे. स्पिन बॉलर्स चालले तर न्यूझीलंडची टीम अडचणीत येऊ शकते. या स्पर्धेत आत्तापर्यंत अफगाणिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सनी ठसा उमटवला आहे. आता टीम इंडियाच्या स्पिनर्सना हे काम करावं लागेल. IND vs NZ: न्यूझीलंडचे 3 अडथळे पार केले तरच टीम इंडियाचा विजय शक्य एकत्रित प्रयत्न टीम इंडियानं 14 वर्षांपासून टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये ही शेवटची टी20 स्पर्धा आहे. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी एकत्र येत विराटसाठी हा कप जिंकायला हवा. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्व खेळाडूंनी एकत्र येत सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्ड कप जिंकला होता. आता या स्पर्धेतील प्रत्येक मॅचमध्ये सर्वांनी विराटसाठी तसेच प्रयत्न केले तर टीम इंडियाला न्यूझीलंडसह आगामी प्रत्येक मॅचमध्ये फायदा होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: