मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup, IND vs AFG: अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर जोशात, टीम इंडियाला हरवण्याचा केला दावा!

T20 World Cup, IND vs AFG: अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर जोशात, टीम इंडियाला हरवण्याचा केला दावा!

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात (T20 World Cup) आजवर एकदाही टीम इंडियाला पराभूत न करु शकणारी अफगाणिस्तानची टीम (India vs Afghanistan) यंदा चांगलीच जोशात आहे

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात (T20 World Cup) आजवर एकदाही टीम इंडियाला पराभूत न करु शकणारी अफगाणिस्तानची टीम (India vs Afghanistan) यंदा चांगलीच जोशात आहे

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात (T20 World Cup) आजवर एकदाही टीम इंडियाला पराभूत न करु शकणारी अफगाणिस्तानची टीम (India vs Afghanistan) यंदा चांगलीच जोशात आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात (T20 World Cup) आजवर एकदाही टीम इंडियाला पराभूत न करु शकणारी अफगाणिस्तानची टीम (India vs Afghanistan) यंदा चांगलीच जोशात आहे. त्यांनी आत्तापर्यंत स्कॉटलंड आणि नामिबियाचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे. पाकिस्तान विरुद्धही अगदी शेवटच्या ओव्हर्सपर्यंत त्यांनी झुंज दिली. अफगाणिस्तानचे तीन मॅचनंतर 4 पॉईंट्स असून ग्रुप 2 मध्ये ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दुसरिकडं बलाढ्य टीम इंडियाची अवस्था सध्या बिकट आहे. पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सनं आणि न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सनं पराभव झाल्यानंतर भारतीय  क्रिकेट टीम सध्या स्पर्धतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोन मॅच मोठ्या फरकानं हरल्यानं टीम इंडिया सध्या दबावात आहे. या परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानच्या फास्ट बॉलरनं टीम इंडियाला पराभूत करण्याचा इशारा दिला आहे.

अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर हमिद हसन (Hamid Hassan) याने टीम इंडियाला पराभूत करण्याची ही सर्वात चांगली संधी असल्याचं मत व्यक्त केलं आहे. 'आम्ही चांगला स्कोर केला तसंच चांगली बॉलिंग आणि फिल्डिंग केली तर आम्ही त्यांना पराभूत करु. आमची टीम मॅचमध्ये 100 टक्के योगदान देईल. आम्ही विकेटचा अभ्यास करु आणि त्यानंतर आमचा प्लॅन तयार करू.

आमची टीम चांगली आहे. आमच्या बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये सुधारणा झाल्याचं तुम्ही पाहू शकता. आमच्याकडं मोहम्मद नबी, राशिद खान आणि मुजीब उर रहमान हे जगातील सर्वश्रेष्ठ स्पिनर्स आहेत. आमची मिडल ऑर्डर चांगले रन करत आहे, हा चांगला संकेत आहे.' असं नामिबियाविरुद्ध 9 रन देऊन 3 विकेट्स घेणाऱ्या हसननं स्पष्ट केलं.

भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी राशिद खानचं फॅन्सना कळकळीचं आवाहन, म्हणाला...VIDEO

आमची बॅटींग 9 व्या क्रमांकापर्यंत आहे. बहुतेक खेळाडू चांगली फटकेबाजी करू शकतात. राशिद खानला अद्याप बॅटींगची संधी मिळालेली नाही, असा इशाराही हसननं यावेळी दिला.

टीम इंडियासाठी अफगाणिस्तानचा पराभव करणे हे तितकं सोपं नाही. कारण यूएईला दुसरं घर समजणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीमपेक्षा (Pakistan Cricket Team) अफगाणिस्तानचा येथील रेकॉर्ड चांगला आहे. अफगाणिस्ताननं आजवर यूएईमध्ये 36 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्यापैकी 28 जिंकले असून फक्त 8 गमावले आहेत.

First published:

Tags: Afghanistan, T20 world cup, Team india