मुंबई, 30 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) गतविजेत्या वेस्ट इंडिजची (West Indies) सुरुवात निराशाजनक झाली. वेस्ट इंडिजचा आधी इंग्लंडनं आणि नंतर दक्षिण आफ्रिकेनं पराभव केला. या दोन पराभवानंतर वेस्ट इंडिजचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं होतं. मात्र त्यांनी शुक्रवारी बांगलादेशचा (West Indies vs Bangladesh) पराभव करत हे आव्हान कायम ठेवलं आहे. वेस्ट इंडिजचा सेमी फायनलची आशा अजूनही कायम असली तरी ती भलतीच खडतर आहे. त्यांना अन्य टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे.
वेस्ट इंडिजचे सध्या 3 मॅचनंतर 2 पॉईंट्स आहेत. तसंच त्यांचा नेट रनरेटही खराब आहे. त्यांना सेमी फायनमध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन मॅच जिंकणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचे 6 पॉईंट्स होतील. नेट रन-रेटचा अडथळा न येताही त्यांना सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलियावर नजर
इंग्लंड टीमच्या आणखी तीन मॅच बाकी आहेत. या सर्व मॅच इंग्लंडनं जिंकणे वेस्ट इंडिजसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियानंही 2 मॅच जिंकल्या असून त्यांच्या तीन मॅच बाकी आहेत. तर ऑस्ट्रेलियानं उर्वरित सर्व मॅच हराव्या अशी वेस्ट इंडिजची इच्छा असेल. वेस्ट इंडिजनं आणखी दोन मॅच जिंकल्या तर त्यांचे 6 पॉईंट्स होतील. ऑस्ट्रेलिया सर्व मॅचमध्ये पराभूत झाल्यास त्यांचे 4 पॉईंटच राहतील आणि वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलियाच्या मागे राहील.
श्रीलंका-दक्षिण आफ्रिकेनं काय करावं?
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचे सध्या 2-2 पॉईंट्स आहेत. या दोन्ही टीमची शनिवारी एकमेकांच्या विरुद्ध लढत आहे. तसंच त्यांच्या इंग्लंड विरुद्धच्या मॅच बाकी आहेत. या दोन्ही टीमनी उर्वरित स्पर्धेत एकपेक्षा जास्त मॅच न जिंकणे आणि इंग्लंडकडून दोघांचाही पराभव होणे वेस्ट इंडिजसाठी फायदेशीर ठरेल.
IND vs NZ: 'करो वा मरो' मॅचपूर्वी टीम इंडियानं केली प्रॅक्टीस रद्द, कारण वाचून बसेल धक्का
बांगलादेशचीही मदत आवश्यक
वेस्ट इंडिजला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठी मदत बांगालदेशला करावी लागेल. सुपर 12 मध्ये अद्यापही एकही मॅच न जिंकलेल्या बांगलादेशला ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. ही सर्व समीकरणं जुळली तर वेस्ट इंडिजची टीम नेट रन रेटशिवाय सेमी फायनलमध्ये पोहचेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.