• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: न्यूझीलंडविरुद्ध मिटणार विराटची डोकेदुखी, दुबईतून आली Good News

T20 World Cup: न्यूझीलंडविरुद्ध मिटणार विराटची डोकेदुखी, दुबईतून आली Good News

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पाकिस्तान विरुद्धची मॅच (India vs Pakistan) गमावल्यानंतर टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे.

 • Share this:
  दुबई, 28 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पाकिस्तान विरुद्धची मॅच (India vs Pakistan) गमावल्यानंतर टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. न्यूझीलंड विरुद्ध रविवारी होणारी मॅच तर 'करो वा मरो' स्वरुपाची आहे. आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा भारतीय क्रिकेट टीमविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये विजयासाठी भारतीय टीमला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. दुबईत होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी आहे. ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) पुन्हा एकदा बॉलिंग सुरू केली आहे. पांड्यानं आयपीएल 2021 मधील सेकंड लेगमध्ये बॉलिंग केली नव्हती. त्याच्या फिटनेसवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचपूर्वी हार्दिकनं बॉलिंग सुरु केल्याचं फुटेज या स्पर्धेचे अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सनं दाखवलं आहे. हार्दिकनं बॉलिंग सुरू करणे ही मोठी बातमी असल्याचं माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने म्हंटलं आहे. त्यानं 2 ओव्हर जरी बॉलिंग केली तरी टीम इंडियाला फायदा होईल. पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीकडं (Virat Kohli) बॉलिंगसाठी फक्त 5 पर्याय होते. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे महागडे ठरल्यानंतरही विराटला पुन्हा त्यांना बॉलिंग द्यावी लागली. T20 World Cup : झहीर खानने केलं टीम इंडियाला सावध, सांगितला न्यूझीलंडचा 'धोका' अश्विनला संधी न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियामध्ये फार बदल होऊ नये असं मत माजी बॅटींग कोच संजय बांगर यांनी व्यक्त केलं आहे. पांड्या बॉलिंगसाठी फिट झाला तर त्यांनी टीममध्ये फक्त एक बदल सुचवला आहे. लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीच्या जागी अनुभवी स्पिनर आर. अश्विनला संधी मिळण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे. पाकिस्तान विरुद्ध वरुण प्रभावी ठरला नव्हता. आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 टीम सेमी फायनलला जाणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ग्रुप 2 मधून टीम इंडिया आणि न्यूझीलंड  या टीम सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र त्यांना पाकिस्तान विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे रविवारची मॅच जिंकणे दोन्ही टीमसाठी महत्त्वाचे आहे.
  Published by:News18 Desk
  First published: