• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup मधून मोठी बातमी, धोनीपेक्षा यशस्वी कॅप्टननं केली निवृत्ती जाहीर

T20 World Cup मधून मोठी बातमी, धोनीपेक्षा यशस्वी कॅप्टननं केली निवृत्ती जाहीर

टी20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) आता रंगतदार अवस्थेत आली आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच महेंद्रसिंह धोनीपेक्षा (MS Dhoni) यशस्वी कॅप्टननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) आता रंगतदार अवस्थेत आली आहे. सुपर 12 फेरीचा एक आठवडा उलटला असून दुसरा आठवडा सुरु झाला आहे. पहिल्या आठवड्यात फार कमाल न करणाऱ्या टीमसाठी हा आठवडा महत्त्वाचा आहे. या आठवड्यात त्यांनी चांगली कामगिरी केली तर त्यांना सेमी फायनलमध्ये प्रवेश करता येईल. ग्रुप 2 मध्ये पाकिस्ताननं (Pakistan Cricket Team) सलग 3 मॅच जिंकत सेमी फायनलमधील जागा पक्की केली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान देशांच्या क्रिकेट टीममध्ये चुरस आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan Cricket Team) टीमनं या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन मॅच खेळल्या आहेत. यापैकी स्कॉटलंड विरुद्धची मॅच त्यांनी मोठ्या फरकानं जिंकली. तर पाकिस्तान विरुद्ध त्यांचा शेवटच्या ओव्हर्समध्ये पराभव झाला. अफगाणिस्तानची रविवारी लढत नामिबिया विरुद्ध (Afghanistan vs Namibia) होणार आहे. ही मॅच जिंकून सेमी फायनलचं आव्हान कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या मॅचपूर्वी अफगाणिस्तानला धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी कॅप्टन असगर अफगान  (Asghar Afghan) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं (ACB) या निर्णयाची माहिती दिली आहे. रविवारी नामिबिया विरुद्ध तो शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. असगरचा कॅप्टन म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील रेकॉर्ड हा महेंद्रसिंह धोनीपेक्षा (MS Dhoni) चांगला आहे. IND vs NZ LIVE Streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत कधी आणि कुठे पाहता येणार? असगरनं अफगाणिस्तानकडून 6 टेस्ट, 114 वन-डे आणि 74 आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानं 44 च्या सरासरीनं 440 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. वन-डे क्रिकेटमध्ये त्यानं 25 सरासरीनं 2424 रन केले असून यामध्ये एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी20 इंटरनॅशनलमध्ये 22 च्या सरासरीनं 1351 रन काढले असून यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. या टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं एका मॅचमध्ये बॅटींग केली असून त्यात 10 रन काढले. असगर अफगाननं अफगाणिस्तानची एकूण 115 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये कॅप्टनसी केली असून यामध्ये 78 मॅचमध्ये अफगाणिस्ताननं विजय मिळवला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: