मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम इंडियात मिळाली नाही संधी, 'या' भारतीयानं ऑस्ट्रेलियन टीमकडून जिंकलं वर्ल्ड कप

T20 World Cup: टीम इंडियात मिळाली नाही संधी, 'या' भारतीयानं ऑस्ट्रेलियन टीमकडून जिंकलं वर्ल्ड कप

टीम इंडियानं 2007 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट टीमला आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकली नाही. मात्र यंदा एका भारतीयानं ऑस्ट्रेलिया टीमसोबत हा वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) जिंकला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट टीमसाठी (Team India) यंदाचा टी20 वर्ल्ड कप निराशाजनक ठरला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाल्यानं टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. टीम इंडियानं 2007 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर टीमला आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकली नाही. मात्र यंदा एका भारतीयानं ऑस्ट्रेलिया टीमसोबत हा वर्ल्ड कप जिंकला आहे. या भारतीयाचं नाव आहे, श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) तो ऑस्ट्रेलियन टीमच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य आहे. त्यानंही यंदा आरोन फिंचच्या टीमसमोबत टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. श्रीराम सध्या ऑस्ट्रेलियन टीमचा असिस्टंट कोच आहे. त्यानं 2015 साली सर्वप्रथम स्पिन बॉलिंग असिस्टंट म्हणून ऑस्ट्रेलियनं टीमसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यानं ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि बोर्डाला चांगलंच प्रभावित केले. त्यानंतर तो आता ऑस्ट्रेलियाचा असिस्टंट कोच आहे. श्रीरामनं टीम इंडियाकडून 8 आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच खेळल्या आहेत. त्यानं यामध्ये 81 रन काढले. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा जबरदस्त रेकॉर्ड आहे. यामध्ये त्यानं 133 मॅचमध्ये 52.99 च्या सरासरीनं 9539 रन काढले आहेत. यामध्ये 32 शतक आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. श्रीराम आयपीएलमधील आरसीबी टाीमच्या कोचिंग स्टाफचाही सदस्य होता. आरसीबीचा बॅटींग आणि स्पिन बॉलिंग कोच म्हणून त्यानं काम केलं आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच विजेतेपद ऑस्ट्रेलियानं रविवारी रात्री दुबईमध्ये झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेट्सनं पराभव करत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup 2021) विजेतेपद पटकावलं.  पाच वेळा वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमनं पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. IND vs NZ: जयपूरमध्ये होणारी पहिली T20 मॅच संकटात, दोन्ही टीमसमोर मोठा पेच न्यूझीलंडने दिलेलं 173 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून अगदी सहज पार केलं. मिचेल मार्शने 50 बॉलमध्ये नाबाद 77 रन केले. मार्शच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नर 38 बॉलमध्ये 53 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेल 18 बॉलमध्ये नाबाद 28 रनवर राहिला. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टचं यशस्वी ठरला. 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन बोल्टने 2 विकेट घेतल्या. याशिवाय कोणत्याही बॉलरला विकेट मिळाली नाही.
First published:

Tags: Australia, Cricket news, T20 world cup

पुढील बातम्या