मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: इंग्लंडच्या विजयाचे रहस्य उलगडले, कॅप्टन मॉर्गननंच केला खुलासा

T20 World Cup: इंग्लंडच्या विजयाचे रहस्य उलगडले, कॅप्टन मॉर्गननंच केला खुलासा

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) 'ग्रुप ऑफ डेथ' समजल्या जाणाऱ्या ग्रुप 1 मध्ये इंग्लंडनं दमदार कामगिरी केली आहे. 2010 साली ही स्पर्धा जिंकणाऱ्या टीमनं पहिल्या तीन मॅच जिंकल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 31 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) 'ग्रुप ऑफ डेथ' समजल्या जाणाऱ्या ग्रुप 1 मध्ये इंग्लंडनं दमदार कामगिरी केली आहे. 2010 साली ही स्पर्धा जिंकणाऱ्या टीमनं पहिल्या तीन मॅच जिंकल्या आहेत. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये गतविजेत्या वेस्ट इंडिजचा, त्यानंतर बांगलादेश आणि शनिवारी झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या तीन विजयामुळे इंग्लंडची सेमी फायनलसाठी दावेदारी बळकट झाली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये  इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडच्या बॉलर्सनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. कांगारूंची अवस्था 4 आऊट 21 अशी बिकट झाली होती, पण कर्णधार एरॉन फिंचने वेड, अगर आणि तळाच्या खेळाडूंना घेऊन ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 20 ओव्हरमध्ये 125 रनपर्यंत पोहोचवला. ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात ऑल आऊट झाला. ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर क्रिस वोक्स आणि टायमल मिल्सला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेलं 126 रनचं आव्हान इंग्लंडने 11.4 ओव्हरमध्येच पार केलं. जॉस बटलरने (Jos Buttler) 32 बॉलमध्ये नाबाद 71 रन केले. 221.88 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या या खेळीमध्ये बटलरने 5 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. जेसन रॉयने 22 आणि जॉनी बेयरस्टोने नाबाद 16 रनची खेळी करून बटलरला चांगली साथ दिली

T20 World Cup मधून मोठी बातमी, धोनीपेक्षा यशस्वी कॅप्टननं केली निवृत्ती जाहीर

मॉर्गननं उलगडलं रहस्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचनंतर बोलताना इंग्लंडचा कॅप्टन इयन मॉर्गननं या कामगिरीचं रहस्य सांगितलं आहे. 'आमही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडपासून दूर क्रिकेट खेळत असताना परिस्थितीशी जुळवून घेणं हे नेहमीच एक आव्हान असतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमची मोठी परीक्षा होती. आम्ही सुरुवातीपासूनच मॅचवर पकड ठेवली. चांगली बॉलिंग करत विकेट्स घेण्याच्या संधी निर्माण केल्या.

आमची बॅटींग चांगलीच फॉर्मात आहे. मागची मॅच जेसन रॉयची होती. तर ही मॅच बटलरनं गाजवली. बटलर आणि रॉयनं जबरदस्त सुरुवात केली. आमचे कष्ट सार्थ ठरत आहे. आम्ही ही कामगिरी यापुढेही सुरु ठेवण्याचा प्रयत्न करु.' असं मॉर्गननं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Australia, England, T20 world cup