मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup Semi Final: ENG vs NZ, 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं भविष्य

T20 World Cup Semi Final: ENG vs NZ, 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं भविष्य

2 वर्षांपूर्वी इंग्लंडनं न्यूझीलंडच्या हातातून (England vs New Zealand) वन-डे वर्ल्ड कप विजेतेपद हिसकावून घेतले होते. आता न्यूझीलंडला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

2 वर्षांपूर्वी इंग्लंडनं न्यूझीलंडच्या हातातून (England vs New Zealand) वन-डे वर्ल्ड कप विजेतेपद हिसकावून घेतले होते. आता न्यूझीलंडला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

2 वर्षांपूर्वी इंग्लंडनं न्यूझीलंडच्या हातातून (England vs New Zealand) वन-डे वर्ल्ड कप विजेतेपद हिसकावून घेतले होते. आता न्यूझीलंडला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 नोव्हेंबर:  न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड  (New Zealand vs England) यांच्यात टी20 वर्ल्ड कप  (T20 World Cup 2021) स्पर्धेची पहिली सेमी फायनल होणार आहे. 2 वर्षांपूर्वी इंग्लंडनं न्यूझीलंडच्या हातातून वन-डे वर्ल्ड कप विजेतेपद हिसकावून घेतले होते. आता न्यूझीलंडला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडला जेसन रॉयच्या (Jason Roy) दुखापतीमुळे मोठा फटका बसला आहे. रॉय आणि जोस बटलर जोडीनं या स्पर्धेत इंग्लंडला दमदार सुरूवात करून दिली होती. आता बटलरसोबत जॉनी बेअरस्टो ओपनिंगला येण्याची शक्यता आहे.तर रॉयच्या जागी सॅम बिलिंग्सचा मिडल ऑर्डरमध्ये समावेश होऊ शकतो.  इंग्लंडच्या बॅटर्सना ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांचं कडवं आव्हान आहे. लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त झाल्यानं त्याच्या जागी टीममध्ये आलेल्या एडम मिल्नेनं योग्य जबाबदारी पार पाडली आहे.

दोन्ही टीममध्ये आजवर 21 टी20 इंटरनॅशनल मॅच झाल्या आहेत. त्यापैकी 13 इंग्लंडनं जिंकल्या असून 7 न्यूझीलंडनं जिंकल्या आहेत. तर एका मॅचचा निर्णय झाला लागला नाही. 2019 साली दोन्ही टीम यापूर्वी आमने-सामने आल्या होत्या. पाच मॅचची ती सीरिज 2-2 नं बरोबरीत होती. त्यानंतर शेवटची मॅच टाय झाली. अखेर इंग्लंडनं सुपर ओव्हरमध्ये ती मॅच जिंकली होती.

टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम आजवर 5 वेळा आमने-सामने आल्या होत्या. यामध्ये न्यूझीलंडनं 2 तर इंग्लंडनं 3 मॅच जिंकल्या आहेत. 2016 टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही या टीम एकमेकांसमोर आल्या होत्या. त्यावेळी इंग्लंडनं 7 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला होता.

ENG vs NZ LIVE Streaming : T20 वर्ल्ड कपमधील पहिली सेमी फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

Dream11 Team Prediction

कॅप्टन - जोस बटलर

व्हाईस कॅप्टन - मोईन अली

बॅटर्स - मार्टीन गप्टील, केन विल्यमसन, डेव्हिड मिलान, डेरली मिचेल

ऑल राऊंडर्स - जेम्स निशाम, लियाम लिविंगस्टोन

बॉलर्स - आदिल रशीद, ट्रेंट बोल्ट, इश सोधी, ख्रिस जॉर्डन

इंग्लंडची टीम: इयन मॉर्गन (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोइन अली, डेव्हिड मलान, सॅम बिलिंग्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, जेम्स विन्से, ख्रिस वोक्स, मार्क वूड, टॉम कुरन, रिस टॉपली आणि  डेव्हिड विली.

न्यूझीलंडची टीम:  केन विलियमसन (कॅप्टन), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे,  मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, ईश सोधी आणि टीम साऊदी

First published:

Tags: England, New zealand, T20 world cup