Home /News /sport /

T20 World Cup: टी20 मधील नंबर 1 खेळाडूला मिळणार नाही जागा, धोनीच्या खास व्यक्तीला संधी

T20 World Cup: टी20 मधील नंबर 1 खेळाडूला मिळणार नाही जागा, धोनीच्या खास व्यक्तीला संधी

टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2021) मुख्य फेरी सुरू होण्यासाठी आता फक्त 2 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तब्बल पाच वर्षांनी होणारी ही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच टीम आता अंतिम रणनीती तयार करत आहेत.

    मुंबई, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2021) मुख्य फेरी सुरू होण्यासाठी आता फक्त 2 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तब्बल पाच वर्षांनी होणारी ही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच टीम आता अंतिम रणनीती तयार करत आहेत. आगामी वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट फॅन्सना काही धक्कादायक निर्णय देखील पाहयला मिळू शकतात. यामध्ये त्यांना जगातील नंबर 1 टी20 बॅटरला बेंचवर बसताना पाहवं लागू शकतं. नंबर 1 टी20 बॅटर डेव्हिड मलान (David Malan) टी20 वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळणे अवघड आहे. इंग्लंडच्या दोन्ही वॉर्म-अप मॅचमध्ये तो फेल गेला. त्याच्या जागी मोईन अलीला (Moeen Ali) नंबर 3 वर खेळण्याची संधी मिळू शकतेय मोईननं आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) जोरदार कामगिरी केली आहे. त्याची स्पिन बॉलिंग देखील टीमसाठी उपयुक्त आहे. इंग्लंडनं बुधवारी झालेल्या दुसऱ्या वॉर्म-अप मॅचमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. यापूर्वी टीम इंडियानं त्यांचा 7 विकेट्सनं पराभव केला होता. इंग्लंडची पहिली लढत 23 ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिज (England vs West Indies) विरुद्ध होणार आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजचा दोन्ही वॉर्म-अप मॅचमध्ये पराभव झाला आहे. डेव्हिड मलानचा टी20 रेकॉर्ड पाहिला तर त्यानं 30 मॅचमध्ये 43 च्या सरासरीनं 1123 रन काढले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 139 आहे. मलानं एक शतक आणि 11 अर्धशतक देखील झळकावली आहेत. पण, त्यानं करिअरमधील बहुतेक मॅच या मायदेशात खेळल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या वॉर्म-अप मॅचमध्ये तो फक्त 15 बॉलमध्ये 11 रन काढून आऊट झाला. त्यापूर्वी भारताविरुद्ध त्यानं 18 बॉलमध्ये 18 रन काढले होते. T20 World Cup : तोफखान्यांशिवाय मैदानात उतरणार England, वनडेनंतर टी-20 वर्ल्ड कपही जिंकणार! मोईन अली फॉर्मात मोईन अलीला दुसऱ्या मॅचमध्ये आराम देण्यात आला होता. त्यानं भारताविरुद्ध 20 बॉलमध्ये नाबाद  43 रनची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याचा टीममध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. 2016 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर पॉवर प्लेमध्ये मोईन अलीचा स्ट्राईक रेट 126 आहे. तर मलानचा 115 आहे. यावर्षी मलान फारसा फॉर्मात नाही. त्याची या वर्षभरातील सरासरी 27 असून स्ट्राईक रेट फक्त 114 आहे. मोईन अलीनं आयपीएल फायनलमध्ये आक्रमक खेळी करत धोनीच्या टीमला चॅम्पियम बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, T20 world cup

    पुढील बातम्या