मुंबई, 11 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup 2021 Semi final 1) न्यूझीलंडनं इंग्लंडचा (New Zealand vs England) 5 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडनं टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 167 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली होती. मार्टीन गप्टील आणि केन विल्यमसन झटपट आऊट झाले. ओपनिंगला आलेल्या डॅरेल मिचेलने (Darell Mitchell) 47 बॉलमध्ये नाबाद 72 रनची इनिंग खेळत न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
धोनी-रोहितमुळे चर्चेत
न्यूझीलंडमधील हॅमिल्टन शहरातील या क्रिकेटपटूच्या घरात रग्बीचं वातावरण आहे. त्याचे वडील जॉन मिचेल हे न्यूझीलंडचे प्रसिद्ध रग्बीपटू आणि कोच आहेत. त्यामुळे मिचेलनं अनेक रग्बीपटूंसोबतच ट्रेनिंग केली आहे. तसंच त्यानं लहानपणी रग्बी हा खेळ देखील खेळलाय.पण, क्रिकेट त्याची पहिली आवड आहे.
मिचेलनं न्यूझीलंडमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली. विशेषत: टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. त्याला भारताविरुद्ध 2019 साली झालेल्या टी20 सीरिजमध्ये पदार्पणाची संधी मिळला. मिचेलसाठी पहिल्या दोन मॅच साधारण गेल्या. पण, हॅमिल्टनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी20 मध्ये त्यानं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडनं ती मॅच 4 रननं जिंकली.
2016 ला स्टोक्स तर 2021 ला हा खेळाडू ठरला व्हिलन, दुसऱ्यांदा इंग्लंडला 'नॉक आऊट' पंच!
वर्ल्ड कपमध्ये नवी जबाबदारी
पहिल्या टी20 वर्ल्ड कप विजेतेपदाच्या शोधात असलेल्या मिचेलवर न्यूझीलंडनं यंदा नवी जबाबदारी सोपवली. त्याला ओपनिंगला खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यानं 27 रन काढत चांगली सुरूवात केली. भारताविरुद्ध त्याचं अर्धशतक फक्त 1 रननं हुकलं. त्यानंतर स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि नामिबिया विरुद्ध तो चांगल्या सुरुवातीनंतर आऊट झाला होता.
इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये एका बाजूनं विकेट पडत असतानाही मिचेलनं निर्धारानं खेळ केला. शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे मिचेल हा खेळ करत असताना त्याचे वडील आणि सर्व कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.