मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: वेस्ट इंडिजच्या पराभवाचा बड्या खेळाडूला धक्का, निवृत्तीची केली घोषणा

T20 World Cup: वेस्ट इंडिजच्या पराभवाचा बड्या खेळाडूला धक्का, निवृत्तीची केली घोषणा

वेस्ट इंडिजची टीम टी20 वर्ल्ड कपमधून (ICC T20 World Cup 2021) बाहेर पडली आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजचा श्रीलंकेनं (West Indies vs Sri Lanka) 20 रननं पराभव केला. या पराभवानंतर वेस्ट इंडिजच्या महान खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 नोव्हेंबर: वेस्ट इंडिजची टीम टी20 वर्ल्ड कपमधून (ICC T20 World Cup 2021) बाहेर पडली आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजचा श्रीलंकेनं (West Indies vs Sri Lanka) 20 रननं पराभव केला. वेस्ट इंडिजचा हा या स्पर्धेतील तिसरा पराभव आहे. त्यांचा यापूर्वी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही पराभव झाला होता. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दुसऱ्यांदा निवृत्ती जाहीर केली आहे.

38 वर्षांच्या ब्राव्होनं 2019 साली रिटायरमेंट मागे घेत टीमला चॅम्पियन करण्याच्या उद्देशानं पुनरागमन केले होते.आजवर झालेले सर्व टी20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये ब्राव्होचा समावेश आहे. 2012 आणि 2016 च्या वर्ल्ड कपमध्ये टीमला चॅम्पियन करण्यात त्याचा वाटा होता.

श्रीलंका विरुद्ध झालेल्या पराभवानंतर ब्राव्होनं ही घोषणा केली. 'माझ्या मते आता वेळ आली आहे. माझं करिअर खूप चांगलं ठरलं. मी 18 वर्ष वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळलो. या करिअरमध्ये अनेक चढ-उतार होते. इतक्या मोठ्या कालावधीसाठी टीमचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. जागतिक क्रिकेटमध्ये वेगळा ठसा उमटवण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा मला अभिमान आहे.' असं ब्राव्होनं सांगितलं.

ब्राव्होची जबरदस्त कारकिर्द

ब्राव्होनं 2004 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून तो सातत्यानं क्रिकेट खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 6 हजार पेक्षा जास्त रन केले. त्याचबरोबर त्यानं वन-डे क्रिकेटमध्ये 199 आणि टेस्टमध्ये 86 विकेट्स घेतल्या. टी20 इंटरनॅशनलमध्ये त्यानं एकूण 78 विकेट्स घेतल्या आहेत. 2013 साली आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) खेळताना त्यानं सर्वात जास्त 32 विकेट्स घेतल्या आहेत.

रनमशिन विराट कोहलीची सर्वात मोठी डोकेदुखी, कधी मिळणार 'तो' मौका?

वेस्ट इंडिजचा तिसरा पराभव

वेस्ट इंडिजचा गुरुवारी या वर्ल्ड कपमध्ये तिसरा पराभव झाला. विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणाऱ्या टीमचं आव्हान या स्पर्धेतून समाप्त झालं आहे. या पराभवानंतर ब्राव्हो चांगलाच निराश झाला होता. 'आम्हाला वर्ल्ड कपमध्ये या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा नव्हती. ही खूप अवघड स्पर्धा होती. आमच्या खेळाडूंनी भविष्यातही मनोबल कायम ठेवलं पाहिजे.' असं ब्राव्होनं स्पष्ट केलं.

First published:

Tags: Sri lanka, T20 world cup, West indies