• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री होणार 'या' IPL टीमचे कोच! 2 दिग्गजही करणार मदत

T20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री होणार 'या' IPL टीमचे कोच! 2 दिग्गजही करणार मदत

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर: टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे. ते 2017 पासून भारतीय क्रिकेट टीमचे कोच होते.  त्यांच्या जागेवर बीसीसीआयनं टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडची (Rahul Dravid) नियुक्ती केली आहे.  प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शास्त्री काय करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'क्रिकबझ' च्या रिपोर्टनुसार अहमदाबाद फ्रँचायझीनं शास्त्री यांच्याशी संपर्क केला आहे. शास्त्री यांनी सध्या टी20 वर्ल्ड कप सुरू असल्यानं त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. शास्त्रींसह टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरूण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर  (R Sridhar) यांनाही करारबद्ध करण्याचा फ्रँचायझीचा प्रयत्न आहे. या तिघांचाही कार्यकाळ या वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. सीव्हीसी कॅपिटल्सनं अहमदाबाद फ्रँचायझीला 7 हजार कोटींमध्ये खरेदी केलं आहे. लखनऊसह अहमदाबादची टीम पुढील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. शास्त्रींसमोर अन्य पर्यायही उपलब्ध रवी शास्त्री आयपीएल टीमच्या कोचिंगसह कॉमेंट्रीमध्येही उतरण्याची शक्यता आहे. पण, आयपीएल टीमचे कोच झाल्यास त्यांचा थेट बीसीसीआयच्या पॅनलमध्ये समावेश होऊ शकत नाही. मात्र ते ब्रॉडकास्टर्सशी करार करू शकतात. टीम इंडियाचा माजी बॅटर सनरायझर्स हैदराबाद टीमशी (SRH) संबंधित आहे. तरीही तो टी20 वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करत आहे. T20 World Cup: ...म्हणून ख्रिस गेलनं केली नाही निवृत्तीची घोषणा! Universe Boss नं सांगितलं कारण आयपीएल 2022 पूर्वी जानेवारी महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. यापूर्वी 8 जुन्या फ्रँचायझी 4 खेळाडूंना रिटेन करू शकते. तर 2 नव्या टीमना ऑक्शनपूर्वी 3 खेळाडूंना करारबद्ध करण्याची संधी मिळेल. अन्य सर्व खेळाडूंचा ऑक्शनमध्ये समावेश होईल. यंदा आयपीएलमध्ये 60 ऐवजी 74 मॅच आहेत. पण, प्रत्येत टीम यापूर्वी प्रमाणेच 14 मॅच खेळणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: