मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC T20 World Cup 2021: स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबत झाला मोठा निर्णय

ICC T20 World Cup 2021: स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबत झाला मोठा निर्णय

यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) पूर्वी एक चांगली बातमी आहे.

यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) पूर्वी एक चांगली बातमी आहे.

यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) पूर्वी एक चांगली बातमी आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 ऑक्टोबर : यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) पूर्वी एक चांगली बातमी आहे. या स्पर्धेच्या दरम्यान स्टेडियममधील क्षमतेच्या 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी (ICC) आणि या स्पर्धेचे यजमान असलेल्या बीसीसीआयला (BCCI) यूएई सरकारनं ही परवानगी दिली आहे. टी20 वर्ल्ड कपची सुरुवात 17 ऑक्टोबर रोजी मस्कतमध्ये होणार आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये फायनल होणार आहे.

आयसीसीचे काळजीवाहू सीईओ जेफ अलार्डिस यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटलं आहे की, 'आम्ही ओमान आणि यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॅन्सचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. क्रिकेट फॅन्सना टी20 वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. आमचे यजमान बीसीसीआय, अमिरात क्रिकेट बोर्ड आणि ओमान क्रिकेट यांच्यासह स्थानिक सरकारचे आभार. त्यांनी फॅन्सना सुरक्षित वातावरणात क्रिकेट पाहता येईल, याची व्यवस्था केली आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'या देशांमध्ये आजवरच्या सर्वात मोठ्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 16 देशांच्या फॅन्सनी याचा आनंद घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी सुरक्षित वातावरणामध्ये पार पडावी यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत. मागील टी20 वर्ल्ड कपला 5 वर्षे झाली आहे. आम्ही जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंची आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी पाहण्यास उत्सुक आहोत.'

T20 World Cup पूर्वी बाबर आझमनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, गेल आणि विराटला टाकलं मागं

बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यावेळी म्हणाले की, 'ओमान आणि यूएईमध्ये होणारा टी20  वर्ल्ड कप फॅन्समध्ये होणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.फॅन्सना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याबद्दल मी दोन्ही देशांच्या सरकारचे आभार व्यक्त करतो. तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. सर्वांनी सुरक्षित राहावे आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी सर्व प्रकारच्या हेल्थ प्रोटोकॉलचं पालन करावं, असं आवाहन मी करत आहे.'

ICC T20 World Cup 2021 Schedule: पाहा सर्व सामन्यांच्या तारखा, कोण कधी भिडणार

भारताची पहिली मॅच कधी?

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला 17 ऑक्टोबर रोजी ओमान विरुद्ध पापूआ न्यू गिनी यांच्यातील मॅचनं सुरुवात होईल. त्याच दिवशी बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातही मॅच होणार आहे. सुपर 12 स्पर्धेतील पहिली मॅच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर भारताची पहिली मॅच 24 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध दुबईत होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, T20 world cup