मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: कॅच सुटल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूनं केली सहकाऱ्याला शिवीगाळ, VIDEO VIRAL

T20 World Cup: कॅच सुटल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूनं केली सहकाऱ्याला शिवीगाळ, VIDEO VIRAL

क्रिकेटच्या मैदानात खराब वागण्यासाठी बांगलादेश टीममधील (Bangladesh Cricket Team) खेळाडू बदनाम आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये बांगलादेशच्या बॉलरनं सहकाऱ्याला शिवीगाळ केली.

क्रिकेटच्या मैदानात खराब वागण्यासाठी बांगलादेश टीममधील (Bangladesh Cricket Team) खेळाडू बदनाम आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये बांगलादेशच्या बॉलरनं सहकाऱ्याला शिवीगाळ केली.

क्रिकेटच्या मैदानात खराब वागण्यासाठी बांगलादेश टीममधील (Bangladesh Cricket Team) खेळाडू बदनाम आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये बांगलादेशच्या बॉलरनं सहकाऱ्याला शिवीगाळ केली.

मुंबई, 5 नोव्हेंबर: क्रिकेटच्या मैदानात खराब वागण्यासाठी बांगलादेश टीममधील (Bangladesh Cricket Team) खेळाडू बदनाम आहेत. टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 मध्ये बांगलादेशनं सर्वच्या सर्व 5 मॅच गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये (Australia vs Bangladesh) बांगलादेशचा 8 विकेट्सनं दणदणीत पराभव झाला. या मॅचमध्ये बांगलादेशच्या फास्ट बॉलरनं संतापात त्याच्याच सहकाऱ्याला शिवीगाळ केली.

ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरमध्ये फास्ट बॉलर तस्कीन अहमद (Taskin Ahmed) त्याचा सहकारी सौम्या सरकारवर (Soumya Sarkar) संतापला होता. तस्कीनच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंचचा (Aaron Finch) उडालेला कॅच घेण्यात सौम्या अपयशी ठरला. त्यामुळे तस्कीनचा राग अनावर झाला.

फिंचनं या जीवदानाचा जबरदस्त फायदा उठवत 20 बॉलमध्ये 40 रनची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीमुळे बांगलादेशनं दिलेलं 74 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियानं 6.2 ओव्हरमध्येच पूर्ण केले. फिंच शिवाय मिचेल मार्शनं 5 बॉलमध्ये दोन फोर आणि एका सिक्सच्या मदतीनं 16 रन काढले.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

बांगलादेशनं यापूर्वी केला प्रकार

बांगलादेशच्या खेळाडूकडून असभ्य वर्तन होण्याची ही या वर्ल्ड कपमधील पहिली घटना नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मॅचमध्ये (South Africa vs Bangladesh) मेहदी हसननं आफ्रिकेचा विकेट किपर - बॅटर क्विंटन डी कॉकला शिवीगाळ केली होती.

विराट कोहलीला धोका दिलेला खेळाडू T20 वर्ल्ड कपमध्ये करतोय जबरदस्त कामगिरी

महेदी हसनच्या बॉलिंगवर डी कॉकनं दोन जोरदार फोर लगावले होते. त्यानंतर  पुढच्या बॉलवर क्विंटन डी कॉकने पुन्हा एकदा जागा बनवून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात बॉल टप्पा पडून आत आला आणि स्टंपला जाऊन धडकला. क्विंटन डी कॉक 16 रनवर आऊट झाला.  क्विंटन डी कॉक परत जात असताना मेहदी हसनने संतापात अपशब्दांचा वापर केला.

First published:
top videos

    Tags: Australia, Bangladesh cricket team, T20 world cup, Video viral