मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पेच, कॅप्टनचं ऐकण्यास निवड समितीचा नकार

T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पेच, कॅप्टनचं ऐकण्यास निवड समितीचा नकार

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) पाकिस्तान क्रिकेटमध्ये पेच निर्माण झाला आहे.  कॅप्टन बाबर आझमच्या (Babar Azam) याचं ऐकण्यास निवड समितीनं नकार दिला आहे.

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) पाकिस्तान क्रिकेटमध्ये पेच निर्माण झाला आहे. कॅप्टन बाबर आझमच्या (Babar Azam) याचं ऐकण्यास निवड समितीनं नकार दिला आहे.

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) पाकिस्तान क्रिकेटमध्ये पेच निर्माण झाला आहे. कॅप्टन बाबर आझमच्या (Babar Azam) याचं ऐकण्यास निवड समितीनं नकार दिला आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट: टी 20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) पाकिस्तान क्रिकेटमध्ये पेच निर्माण झाला आहे.  कॅप्टन बाबर आझमच्या (Babar Azam) याचं ऐकण्यास निवड समितीनं नकार दिला आहे. पाकिस्तान टीमचा वरिष्ठ खेळाडू शोएब मलिकचा (Shoaib Malik) टीममध्ये समावेश करावा अशी बाबरची मागणी आहे. मात्र त्याच्या या मागणीकडं निवड समितीचे प्रमुख मोहम्मद वासिमनं  (Mohammad Wasim) दुर्लक्ष केलं आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये हा टी20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि भारत या दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये असून 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्यातील महामुकाबला होणार आहे.

'क्रिकेट पाकिस्तान'नं दिलेल्या बातमीनुसार बाबर आझमनं शोएब मलिकला एक संधी देण्याची मागणी केली आहे. पण निवड समितीनं त्याला सकारात्मक उत्तर दिलेलं नाही. शोएब आता 39 वर्षांचा आहे. त्यामुळे तो टीममध्ये निवड होण्यासाठी योग्य नाही, असं निवड समितीचं मत आहे. गेल्या 14 टी20 मध्ये पाकिस्तानकडून बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि फखर जमां या तीनच बॅट्समनी अर्धशतक झळकावले आहे. त्यांच्या मिडल ऑर्डरनं सातत्यानं निराशा केली आहे. त्यामुळेच टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा जास्त रन करणाऱ्या शोएब मलिकच्या समावेशासाठी बाबर आग्रही आहे.

सप्टेंबरमध्ये खेळली शेवटची मॅच

शोएब मलिकनं सप्टेंबर 2020 नंतर पाकिस्तानकडून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तरीही त्याचा फॉर्म चांगला आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेत त्यानं 354 रन काढले होते. त्या स्पर्धेत सर्वात जास्त रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत शोएब चौथ्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे खराब कामगिरीनंतरही पाकिस्तानच्या टीममध्ये 40 वर्षांच्या मोहम्मद हफीजला जागा मिळाली आहे.

IND vs ENG: इंग्लंडच्या क्रिकेटपटूची विराटवर जहरी टीका, फॅन्सनं शाळा घेताच मारली पलटी

शोएब मलिक पाकिस्तानच्या वरिष्ठ खेळाडूंपैकी आहे. त्यानं 116 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 31 च्या सरासरीनं 2355 रन काढले आहेत. यामध्ये 8 अर्धशतकांचा समावेश आहे.पाकिस्तानकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. शोएब मलिकनं त्याच्या टी20 कारकिर्दीमध्ये 425 मॅचमध्ये 37 च्या सरासरीनं 10741 रन काढले आहेत. यामध्ये 66 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच नाही तर त्यानं 152 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

First published:

Tags: Babar azam, Pakistan