• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup AUS vs SA, Dream 11 Prediction: 'या' 11खेळाडूंवर आजमवा भविष्य

T20 World Cup AUS vs SA, Dream 11 Prediction: 'या' 11खेळाडूंवर आजमवा भविष्य

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर 12 मधील पहिली मॅच खेळली जाणार आहे. (AFP)

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर 12 मधील पहिली मॅच खेळली जाणार आहे. (AFP)

टी20 वर्ल्ड कपमधील (ICC T20 World Cup 2021) खऱ्या लढतींना आजपासून (शनिवार, 23 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. सुपर 12 मधील पहिली मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कपमधील (ICC T20 World Cup 2021) खऱ्या लढतींना आजपासून (शनिवार, 23 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. सुपर 12 मधील पहिली मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात होत आहे. आयसीसीच्या सध्याच्या रँकिंग नुसार दक्षिण आफ्रिकेचं पारडं या मॅचमध्ये जड आहे. आफ्रिकेची टीम 5 तर ऑस्ट्रेलियाची टीम 7 व्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेनं मागील 10 पैकी 9 मॅच जिंकल्या आहेत. त्याचबरोबर मागील दोन्ही वॉर्म-अप मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर ऑस्ट्रेलियानं शेवटच्या 10 टी20 मॅचमधील 8 गमावल्या आहेत. इतकंच नाही तर मागील चार टी20 सीरिजमध्येही ऑस्ट्रेलियन टीम पराभूत झाली आहे. ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली शेवटची टी20 सीरिज जिंकली होती. ही एकमेव त्यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे. त्या सीरिजमध्ये कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी धमाकेदार इनिंग खेळली होती. यंदा या दोघांचाही फॉर्म हरपलाय. आफ्रिकेविरुद्ध 4 स्पेशालिस्ट बॉलर्ससह उतरणार असल्याचं फिंचनं जाहीर केलं आहे. T20 World Cup: पहिल्या विजेतेपदासाठी Australia लावणार बाजी, 'या' खेळाडूंचा फॉर्म ठरणार निर्णायक Australia vs South Africa Dream 11 Prediction विकेटकिपर - क्विंटन डी कॉक बॅटर - डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, रासी व्हॅन डेर दुसान, एडेन मार्करम ऑल राऊंडर - ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श बॉलर - मिचेल स्टार्क, तरबेज शम्सी, एनरिक नॉर्खिया आणि अ‍ॅडम झम्पा T20 World Cup : South Africa सगळ्यात दुबळी टीम, ग्रुप ऑफ डेथमध्ये उलटफेर करणार? ऑस्ट्रेलियाची संभाव्य Playing 11 : आरोन फिंच (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, मार्कस स्टॉईनिस, अ‍ॅस्टन अगर, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा आणि जोश हेजलवूड दक्षिण आफ्रिकेची Playing 11 :  क्विंटन डिकॉक, टेंबा बावूमा (कॅप्टन), एडन मारर्कम, रासी व्हॅन डेर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, वियान मुल्डर, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेज शम्सी
  Published by:News18 Desk
  First published: