मुंबई, 14 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेची फायनल होणार आहे. या दोन्ही टीम यापूर्वी 2015 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांच्या समोर आल्या होत्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला होता. आता न्यूझीलंडला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.
न्यूझीलंडची टीमनं गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. केन विल्यमसनच्या टीमनं सुपर 12 मध्ये चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन केलं होतं. सेमी फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करताना त्यांनी बॅटींगही चांगली केली. तर ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर डेव्हिड वॉर्नर (David Warner) फॉर्मात परतला आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानं ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दोन्ही टीमनं आजवर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे या फायनलनंतर क्रिकेट विश्वाला नवा टी20 चॅम्पियन मिळणार आहे.
किती वाजता सुरू होणार सेमी फायनल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यातील फायनल 14 नोव्हेंबर रोजी रविवारी दुबईमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल.
कुठे होणार लाईव्ह प्रसारण?
या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.
जिओवरही पाहता येणार मॅच
रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना फायनल मॅच पाहण्याची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येतील.
मोठी बातमी: BCCI ची होणार चांदी, IPL च्या कमाईवर द्यावा लागणार नाही टॅक्स
ऑस्ट्रेलियाची टीम: आरोन फिंच (कॅप्टन), अॅस्टन अगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि अॅडम झम्पा
न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), टोड अॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, इश सोधी आणि टीम साऊदी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, New zealand, T20 world cup