मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup Final: वर्ल्ड कप फायनल कशी जिंकणार? विल्यमसननं सांगितली रणनीती

T20 World Cup Final: वर्ल्ड कप फायनल कशी जिंकणार? विल्यमसननं सांगितली रणनीती

टी वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup-2021) आता शेवटच्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात फायनल मॅच होणार आहे.

टी वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup-2021) आता शेवटच्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात फायनल मॅच होणार आहे.

टी वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup-2021) आता शेवटच्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात फायनल मॅच होणार आहे.

दुबई, 14 नोव्हेंबर:  टी वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup-2021) आता शेवटच्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात फायनल मॅच होणार आहे. आजवर या दोन्ही टीमनं हा वर्ल्ड कप जिंकलेला नाही. न्यूझीलंडची टीम तर या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये गेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये न्यूझीलंडवर दबाव असेल अशी चर्चा त्यांचा कॅप्टन केन विल्यमसननं  (Kane Williamson) फेटाळून लावली आहे.

न्यूझीलंडची टीम यापूर्वी 2015 आणि 2019 चा वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली होती. तसंच त्यांनी पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं (WTC-2021) विजेतेपद पटकावलं होतं. या चारपैकी तीन फायनलमध्ये विल्यमसन न्यूझीलंडचा कॅप्टन होता. विल्यमसननं या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, 'हे सर्व कठोर कष्टाचं फळ आहे. पण, आमच्यासाठी फायनल म्हणजे अन्य कोणत्याही मॅचसारखी आहे. त्यामुळे आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष फोकस करणार आहोत.

आमची टीम चांगला सांघिक खेळ करत आहे. सर्व खेळाडू एकमेकांची मदत करत आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही नेहमीच शिकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्याकडं आणखी एक संधी आहे. फायनल मॅचमधील अंडरडॉग असं जरी कुणी आम्हाला म्हणालं तरी त्याचा काही फरक पडणार नाही. आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि चांगली कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू', असं विल्यनसननं स्पष्ट केलं.

AUS vs NZ LIVE Streaming : T20 वर्ल्ड कप फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडनं इंग्लंडचा 5 विकेट्सनं पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं 167 रनचं आव्हान न्यूझीलंडनं 6 बॉल आणि 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. डॅरेल मिचेलनं (Darell Mitchell) 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या स्पर्धेत न्यूझीलंडनं आजवर 6 मॅच खेळल्या असून त्यामधील 5 मॅच जिंकल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Australia, New zealand, T20 world cup