मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर, IPL मधील करोडपतीला जागा नाही

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर, IPL मधील करोडपतीला जागा नाही

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये आयपीएलमधील करोडपतींना (IPL 2021) जागा मिळवण्यात अपयश आलं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये आयपीएलमधील करोडपतींना (IPL 2021) जागा मिळवण्यात अपयश आलं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये आयपीएलमधील करोडपतींना (IPL 2021) जागा मिळवण्यात अपयश आलं आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट :  क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीमची घोषणा केली आहे. गेले काही दिवस दुखापतीमुळे बाहेर अससेल्या आरोन फिंचकडं (Aaron Finch) टीमचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. फिंच गेल्या 10 आठवड्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो या वर्ल्ड कपपूर्वी फिट होऊन परतेल अशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आशा आहे. वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आजवर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या दौऱ्यातून माघार घेणारे ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉईनिस आणि केन रिचर्डसन यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या तिघांना वर्ल्ड कप टीममधून वगळण्यात येऊ शकते असा इशारा फिंचनं दिला होता. कॅप्टन फिंचप्रमाणेच  स्टीव्ह स्मिथचंही टीममध्ये पुनरागमन झाले आहे. स्मिथनं फिटनेसच्या कारणामुळे वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली होती. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड या त्रिकुटाचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पण विकेट किपर - बॅट्समन अ‍ॅलेक्स कॅरीला टीममध्ये जागा मिळवण्यात अपयश आलंय.

नव्या खेळाडूचा समावेश, IPL करोडपती बाहेर

ऑस्ट्रेलियन निवड समितीानं सर्वांना धक्का देत जोश इंग्लिस  (Josh Inglis) या विकेट-किपर बॅट्समनचा टीममध्ये  समावेश केलाय. इंग्लिसनं अद्याप एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. बिग बॅश लीग आणि इंग्लंडमधील टी20 स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याची थेट वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली आहे. तर आयपीएलमधील करोडपती बॉलर झाय रिचर्डसन आणि ऑल राऊंडर  मोईसेस हेनरिक्स यांना वर्ल्ड कप टीममधून बाहेर ठेवण्यात आलं आहे.

राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ पदासाठी केला अर्ज

ऑस्ट्रेलियाची टीम : आरोन फिंच (कॅप्टन), अ‍ॅस्टन अगर, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मिचेल स्विप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा

राखीव खेळाडू : डॅन ख्रिस्टीन, नॅथन एलिस, डेवियन सॅम्स

First published:

Tags: Australia, Cricket news