मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम इंडिया नाही, तर आम्हीच वर्ल्ड कप जिंकणार! 'या' कॅप्टननं दिला इशारा

T20 World Cup: टीम इंडिया नाही, तर आम्हीच वर्ल्ड कप जिंकणार! 'या' कॅप्टननं दिला इशारा

टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) विजेतेपदासाठी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या माजी विजेत्या टीमचे नावं आघाडीवर आहेत. मात्र या सर्व टीमना आता आणखी एका टीमपासून सावध राहावं लागणार आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 17 ऑक्टोबर:  टी20 वर्ल्ड कपला आजपासून (17 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. 12 देशांमध्ये या वर्ल्ड कपची मुख्य फेरी होणार आहे. या वर्ल्ड कपच्या विजेतेपदासाठी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या माजी विजेत्या टीमचे नावं आघाडीवर आहेत. मात्र या सर्व टीमना आता आणखी एका टीमपासून सावध राहावं लागणार आहे. कारण, या देशाच्या कॅप्टननं वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी आम्हीच विजेते होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा लिमिटेड ओव्हर टीमचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) याने आमची टीम वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाची पहिली लढत 23 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध होणार आहे. या वर्ल्ड कपपूर्वी वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरुद्ध झालेल्या टी20 सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. या पराभवानंतरही फिंचचा वर्ल्ड कप जिंकण्याचा आत्मविश्वास कायम आहे. फिंचनं आयसीसी क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना सांगितलं की, 'ही ट्रॉफी आमच्याकडं नाही. आम्ही अनेकदा याच्या जवळ आलो आहोत. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असेल.' ऑस्ट्रेलियाला 2007 साली सेमी फायनलमध्ये भारतानं हरवलं होतं. त्यानंतर 3 वर्षांनी फायनलमध्ये त्यांचा इंग्लंडनं पराभूत केलं. तर 2012 साली वेस्ट इंडिजनं त्यांची वाटचाल रोखली. भारत-पाकिस्तान मॅचच्या दिवशी सानिया मिर्झा काय करणार? VIDEO शेअर करत सांगितला प्लॅन फिंच यावेळी पुढे म्हणाला की, 'हा वर्ल्ड कप खेळण्याचा आमचा आत्मविश्वास आहे. आमच्या टीमनं बरंच टी20 क्रिकेट खेळलं आहे. प्रत्येक टीम मॅच जिंकू शकते. तसंच सर्वच टीममध्ये मॅचविनर खेळाडू आहेत, याची मला जाणीव आहे. आम्हाला फक्त योग्यवेळी योग्य काम करायचं आहे.' T20 World Cup: सौरव गांगुलीनं टीम इंडियाला सांगितला चॅम्पियन होण्याचा मंत्र ऑस्ट्रेलियाचं वेळापत्रक टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 मध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश ग्रुप 1 मध्ये आहे. ऑस्ट्रेलियाची पहिली लढत 23 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी दुसरी मॅच पात्रता फेरीतून विजयी होणाऱ्या टीमशी असेल. 30 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाची लढत इंग्लंडशी होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा पात्रता फेरीतील टीमशी लढत होणार आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी शेवटची लढत वेस्ट इंडिजशी होणार आहे.
First published:

Tags: Cricket news, T20 world cup

पुढील बातम्या