• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मवर आली ऑस्ट्रेलियन कॅप्टनची प्रतिक्रिया, म्हणाला...

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मवर आली ऑस्ट्रेलियन कॅप्टनची प्रतिक्रिया, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॅटर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) वॉर्नरचा खराब फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी काळजीचा विषय आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॅटर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. या खराब फॉर्ममुळे सनरायझर्स हैदराबादनं (SRH) त्याची प्रथम कॅप्टनपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आले. त्यामुळे वॉर्नर गेल्या काही मॅचमध्ये खेळलेला नाही. आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) वॉर्नरचा खराब फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी काळजीचा विषय आहे. टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरू होत आहे. या वर्ल्ड कपपूर्वी वॉर्नरच्या खराब फॉर्मबद्दल ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) यानं प्रतिक्रिया दिली आहे. फिंचनं 'क्रिकइन्फोशी' बोलताना सांगितले्ेकी, 'वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तो आगामी वर्ल्ड कपमध्ये ओपनिंगलाच खेळेल. मला त्याच्या तयाारीची काहीही काळजी नाही. त्याला हैदराबादकडून खेळायला आवडले असते, यात कोणतीही शंका नाही. पण, तो अजूनही क्रिकेटचा सराव करत आहे. तसंच त्याची तयारी सुरू आहे. याबाबत मला कोणतीही शंका नाही.' वॉर्नरनं सप्टेंबर 2020 नंतर ऑस्ट्रेलियासाठी एकही आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळलेली नाही. तो दुखापत, विश्रांती आणि अन्य कार्यक्रमांमुळे मागील चार सीरिजमधील 14 टी20 खेळू शकलेला नाही. त्यानं या आयपीएल सिझनमध्ये आठ इनिंगमध्ये फक्त 2 अर्धशतक झळकावली आहेत. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या फेजमध्ये सनरायझर्सनं त्याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली होती. IPL 2021: शेवटच्या ओव्हरमध्ये कसं रोखलं डिविलियर्सचं वादळ? भुवनेश्वर कुमारनं केला खुलासा वॉर्नर विश्रांतीच्या कारणामुळे वेस्ट इंडिज तसंच बांगलादेशच्या दौऱ्यावरही गेला नव्हता. आयपीएल स्पर्धेच्या या फेजमध्ये (IPL 2021 Phase 2) तो फक्त 2 मॅच खेळला आहे. या 2 इनिंगमध्ये त्यानं फक्त 2 रन काढल्यानं सनरायझर्सनं त्याची टीममधूनही हकालपट्टी केली आहे. IPL 2021, RCB vs SRH: जम्मू-काश्मीरचा Umran Malik बनला वेगाचा बादशाह; विराटने दिलं खास गिफ्ट आरोन फिंचच्या गुडघ्याचंही जुलै महिन्यात ऑपरेशन झालं आहे. या ऑपरेशनंतर फिंच मैदानावर परतत आहे. ऑस्ट्रेलियाची टीम न्युझीलंड विरुद्ध (18 ऑक्टोबर) आणि भारताविरुद्ध (20 ऑक्टोबर) प्रॅक्टीस मॅच खेळणार आहे. या मॅचपूर्वी आपण पूर्ण फिट होऊ असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: