Home /News /sport /

T20 World Cup: IPL मध्ये दुर्लक्ष केलेला बॉलर ठरला हिट, 4 ओव्हर्समध्ये फक्त 2 रन देत घेतल्या 3 विकेट्स

T20 World Cup: IPL मध्ये दुर्लक्ष केलेला बॉलर ठरला हिट, 4 ओव्हर्समध्ये फक्त 2 रन देत घेतल्या 3 विकेट्स

टी20 क्रिकेटमध्ये बॉलर्सची धुलाई होणं ही सामान्य गोष्ट आहे. सर्व मोठ्या बॉलर्सना याचा कधीतरी फटका बसला आहे. मात्र वेस्ट इंडिज विरुद्ध बुधवारी झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या (West Indies vs Afghanisthan) बॉलरनं चमत्कार केला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑक्टोबर: टी20 क्रिकेटमध्ये बॉलर्सची धुलाई होणं ही सामान्य गोष्ट आहे. सर्व मोठ्या बॉलर्सना याचा कधीतरी फटका बसला आहे. मात्र वेस्ट इंडिज विरुद्ध बुधवारी झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या (West Indies vs Afghanisthan) बॉलरनं चमत्कार केला. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 2 रन देत 3 विकेट्स घेतल्या. 4 ओव्हर 2 मेडन 2 रन आणि 3 विकेट्स अशी त्यानं बॉलिंग करत सर्वच टीमना धोक्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानच्या टी20 टीमचा कॅप्टन मोहम्मद नबीनं (Mohammed Nabi) हा पराक्रम केलाय. त्यानं गतविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध 24 पैकी 22 बॉल निर्धाव टाकले. नबीच्या या बॉलिंगच्या जोरावर अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजचा 56 रननं पराभव  केला. गतविजेत्या वेस्ट इंडिजचा मुख्य स्पर्धेपूर्वी हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी पाकिस्ताननं त्यांचा पराभव केला होता. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 189/5 या स्कोअरपर्यंत मजल मारली. हजरतुल्लाह झझई आणि मोहम्मद शहजाद या दोन ओपनरनी 8.5 ओव्हरमध्ये 90 रनची पार्टनरशीप केली. झझईने 56 आणि शहजादने 54 रन केले, तर गुरबाजने 33 आणि नजीबुल्लाहने 23 रनचं योगदान दिलं. वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकोयला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर रामपॉल हेडन वॉल्श आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. अफगाणिस्तानने दिलेलं 190 रनचं आव्हान पार करताना वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून फक्त 133 रन करता आल्या. रोस्टन चेसने सर्वाधिक 54 रन केले, तर निकोलस पूरनने 35 रनची खेळी केली. नबीनं वेस्ट इंडिजच्या आक्रमक खेळाडूंना जखडून ठेवल्यानं त्यांना मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. T20 World Cup: बाबर आझमला बसले दोन मोठे धक्के, भारताविरुद्ध सलग सहावा पराभव नक्की! आयपीएलमध्ये दुर्लक्ष मोहम्मद नबी हा या आयपीएलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा सदस्य होता. त्याला संपूर्ण आयपीएलमध्ये फक्त 3 मॅच संधी मिळाली. त्यामध्ये त्यानं 2 विकेट्स घेतल्या. यूएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये तर त्यानं फक्त 1 मॅच खेळली. त्याच यूएईच्या पिचवर त्यानं ही जबरदस्त बॉलिंग करत त्याच्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या हैदराबादच्या मॅनेजमेंटला नबीनं खेळातून उत्तर दिलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, T20 world cup, West indies

    पुढील बातम्या