Home /News /sport /

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खाननं रचला इतिहास, मलिंगाला टाकलं मागं

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खाननं रचला इतिहास, मलिंगाला टाकलं मागं

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाला. या पराभवानंतरही अफगाणिस्तानचा प्रमुख बॉलर राशिद खान (Rashid Khan) यानं रेकॉर्ड इतिहास रचला आहे.

    दुबई, 30 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाला. या पराभवानंतरही अफगाणिस्तानचा प्रमुख बॉलर राशिद खान (Rashid Khan) यानं रेकॉर्ड इतिहास रचला आहे. राशिद आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा बॉलर बनला आहे. 23 वर्षांच्या राशिदनं 53 व्या आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये हा रेकॉर्ड केला. यापूर्वी हा रेकॉर्ड श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगाच्या नावावर होता. त्यानं 76 मॅचमध्ये हा टप्पा गाठला होता. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं 84 मॅचमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. राशिदनं पाकिस्तानच्या इनिंगमधील 15 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद हाफिजला (10) आऊट करत हा रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर त्यानं बाबर आझमला आऊट करत एकूण विकेट्सची संख्या 101 केली. राशिदनं आता एकूण 53 मॅचमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्यानं 2 वेळा एका मॅचमध्ये 5 विकेट्स तर 4 वेळा एका मॅचमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तान टीमने दिलेले 147 रन्सचे आव्हान पार करत असताना पाकिस्तानच्या टीमला चांगलीच दमछाक झाली. ओपनिंग जोडी तिसऱ्याच ओव्हरमध्ये फुटली. मोहम्मद रिझवान 8 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर बाबर आझमने दमदार बॅटिंग करत 51 रन केले. PAK vs AFG: क्रिकेट फॅन्समध्ये जोरदार मारामारी, लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडवले! पाहा VIDEO पाकिस्तानच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडत होत्या. त्यामुळे अफगाणिस्तानची विजयाची आशा कायम होती. 17 व्या ओव्हरमध्ये मैदानात सेट झालेला बाबर आझम तर 18 व्या ओव्हरमध्ये अनुभवी शोएब मलिक आऊट झाला. त्यानंतर शेवटच्या 12 बॉलमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 24 रनची आवश्यकता होती. त्यावेळी आसिफ अलीनं करिम जनतच्या एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरही अफगाणिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याची आशा कायम आहे. अफगाणिस्ताननं या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी एकामध्ये विजय मिळवला असून एक मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. उर्वरित तीन मॅचमध्ये चांगली कामगिरी केल्यास अफगाणिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये दाखल होऊ शकते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या