मुंबई, 28 ऑक्टोबर: अफगाणिस्तान (Afghanistan) हा देश सध्या खूप मोठ्या संकटातून जात आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी (Taliban) देशाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचं जगणं अवघड झालं आहे. अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला (Afghanistan Cricket Team) याचा फटका बसलाय. पण टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) या टीमनं या सर्व संकटाचा परिणाम न होता दमदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्ताननं पात्रता फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यानंतर मुख्य फेरीत स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरूवात केली आहे.
अफगाणिस्तानचा कॅप्टन मोहम्मद नबीचा (Mohammad Nabi) एक मजेदार व्हिडीओ सध्या वेगानं व्हायरल होत आहे. स्कॉटलंड विरुद्धच्या मॅच नंतरचा हा व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर हिट झाला आहे.
स्कॉटलंड विरुद्धच्या विजयानंतर प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वी नबी थोडा नर्वस झाला होता. या व्हिडीओत तो कुणाला तरी म्हणतोय की, 'हे सर्वात अवघड काम आहे. किती प्रश्न आहेत. माझं इंग्रजी 5 मिनिटांंमध्ये संपेल भाई.'
"5 mint main meri English Khatam hojye gi"😂#T20WorldCup2021 pic.twitter.com/ugbmHFLeL4
— Abdul Wahab (@abdulwahabdr02) October 26, 2021
नबीचे अश्रू अनावर
अफगाणिस्तानच्या टीमनं स्कॉटलॅंडचा (Afghanistan v Scotland) पराभव करून विजयी सुरुवात केली. अफगाणिस्तानसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. कारण देशात तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतरच अफगाणिस्तान क्रिकेटवर (Taliban Rule in Afghanistan) संकट निर्माण झालं होतं. स्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. या वेळी अफगाणिस्तानचा कॅप्टन मोहम्मद नबीला अश्रू अनावर झाले होते.
T20 World Cup: वेस्ट इंडिजचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे आऊट, अनुभवी ऑल राऊंडरची टीममध्ये एन्ट्री
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, T20 world cup