मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहलीला धोका दिलेला खेळाडू T20 वर्ल्ड कपमध्ये करतोय जबरदस्त कामगिरी

विराट कोहलीला धोका दिलेला खेळाडू T20 वर्ल्ड कपमध्ये करतोय जबरदस्त कामगिरी

टी20 वर्ल्ड कपमधील महत्त्वाच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा (Australia vs Bangladesh) मोठा पराभव केला आहे. विराट कोहलीला धोका देणारा खेळाडू या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा हिरो ठरला.

टी20 वर्ल्ड कपमधील महत्त्वाच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा (Australia vs Bangladesh) मोठा पराभव केला आहे. विराट कोहलीला धोका देणारा खेळाडू या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा हिरो ठरला.

टी20 वर्ल्ड कपमधील महत्त्वाच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा (Australia vs Bangladesh) मोठा पराभव केला आहे. विराट कोहलीला धोका देणारा खेळाडू या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा हिरो ठरला.

मुंबई, 5 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील महत्त्वाच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा (Australia vs Bangladesh) मोठा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पिनर अ‍ॅडम झम्पा  (Adam Zampa) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं बांगलादेश विरुद्ध टी20 इंटरनॅशनल करिअरमधील सर्वोत्तम बॉलिंग केली. झम्पानं 19 रन देत 5 विकेट्स घेतल्या. झम्पाच्या भेदक बॉलिंगमुळे बांगलादेशची संपूर्ण टीम 73 रन काढून ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं हे आव्हान 6.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

झम्पा आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा सदस्य होता. यावर्षी यूएईमध्ये झालेल्या लेगमधून त्यानं माघार घेत विराटला धक्का दिला होता. झम्पानं पहिल्यांदा टी20 इंटरनॅशनलमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी 14 रन देत 3 विकेट्स हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर होता.

झम्पानं 54 टी20 मॅचमध्ये 61 विकेट्स घेतल्या असून यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट 6.88 आणि स्ट्राईक रेट 18.3 इतका आहे. या वर्ल्ड कपमध्येही तो चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यानं 4 मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. झम्पानं यापूर्वी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. या वर्ल्ड कपमध्ये एखाद्या बॉलरनं एकाच मॅचमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अफगाणिस्तानच्या मुजीब-उर-रहमाननं स्कॉटलंड विरुद्ध ही कामगिरी केली आहे.

अफगाणिस्तानच्या मदतीला टीम इंडियाची धाव, अश्विननं दिली मोठी ऑफर

ग्रुप 1 मधून इंग्लंडनं 4 पैकी 4 मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस आहे. या दोन्ही टीमनं 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एक गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेची शेवटची मॅच इंग्लंड (South Africa vs England) विरुद्ध होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाती लढत वेस्ट इंडिजविरुद्ध (Australia vs West Indies) आहे.  दोन वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजचं तीन पराभवासह या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Australia, RCB, T20 world cup, Virat kohli