मुंबई, 9 सप्टेंबर : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएलसह टी 20 वर्ल्ड कपमध्येही ठसा उमटवला आहे. वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय टीम इंडियात मुंबई इंडियन्सच्या 6 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मासह (Rohit Sharma) सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि राहुल चहर यांचा समावेश आहे.
रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबईनं सर्वाधिक 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. 2020 साली आयपीएलचा पूर्ण सिझन यूएईमध्ये झाला होता. त्यावेळी मुंबईनं ती स्पर्धा जिंकली होती. आता मुंबईचे खेळाडू टीम इंडियासाठी त्याच मैदानावर कमाल करतील. वर्ल्ड कपपूर्वी यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत या खेळाडूंना पिचचा आणखी अंदाज येण्यास मदत होणार आहे.
यूएईमध्ये मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) सूर्यकुमार यादवनं 16 मॅचमध्ये 145 च्या स्ट्राईक रेटनं 480 रन काढले आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्मानं 332 तर हार्दिक पांड्यानं 281 रन काढले होते. यामध्ये हार्दिकचा स्ट्राईक रेट 179 होता. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहनं 15 मॅचमध्ये 15 च्या सरासरीनं 27 विकेट्स घेतल्या होत्या. राहुल चहरनं 15 मॅचमध्ये 15 विकेट्स तर इशान किशननं 500 पेक्षा जास्त रन काढले होते.
LET’S GO #OneFamily #T20WorldCup @BCCI pic.twitter.com/itOugxOVu5
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2021
14 वर्षांपासून प्रतीक्षा
हा टी20 वर्ल्ड कप कॅप्टन विराट कोहलीसाठी देखील महत्त्वाचा आहे. टीम इंडियानं 2007 नंतर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. तसंच 2013 नंतर एकदाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं नाही. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारताला आजवर एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये विराटच्य़ा कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.
टीम इंडियात निवड झाल्यानंतर अश्विन झाला इमोशनल, भावुक मेसेज केला शेअर
हा वर्ल्ड कप भारतामध्ये होणार होता. पण, कोरोना महामारीमुळे तो यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद बीसीसीआयकडंच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Mumbai Indians, T20 world cup