मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /2 दिवसांमध्ये 6 मोठे वाद, T20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप

2 दिवसांमध्ये 6 मोठे वाद, T20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) सोमवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम जाहीर केली आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगानं घडामोडी घडत असून 2 दिवसांमध्ये 6 मोठे वाद निर्माण झाले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) सोमवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम जाहीर केली आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगानं घडामोडी घडत असून 2 दिवसांमध्ये 6 मोठे वाद निर्माण झाले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) सोमवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम जाहीर केली आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगानं घडामोडी घडत असून 2 दिवसांमध्ये 6 मोठे वाद निर्माण झाले आहेत.

मुंबई, 8 सप्टेंबर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) सोमवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम जाहीर केली आहे. या टीममध्ये शोएब मलिक आणि सर्फराज अहमद यांना संधी देण्यात आलेली नाही. टीम निवडीनंतर 2 तासांमध्ये मुख्य कोच मिसबाह इल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूस यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगानं घडामोडी घडत असून 2 दिवसांमध्ये 6 मोठे वाद निर्माण झाले आहेत.

सिनिअर खेळाडूंकडं दुर्लक्ष : 15 सदस्यीय टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये शोएब मलिक आणि सर्फराज अहमद या सिनिअर खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. सर्फराजच्या जागी आझम खानची निवड झाल्यानं वाद आणखी चिघळलाय. त्याचबरोबर खराब फॉर्मात असलेल्या असिफ अली आणि खुशदिल शाह यांची टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

दोन कोचचा राजीनामा : पाकिस्तान टीमचे मुख्य कोच मिसबाह उल हक यांच्याशी चर्चा न करता टीमची निवड करण्यात आली. इतकंच नाही तर न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मिसाबहनं  तो सल्ला फेटाळला. बोर्डाशी झालेल्या वादामुळे त्याने अखेर राजीनामा दिला.

बाबर आझमवर टांगती तलवार : पाकिस्तान टीमच्या कॅप्टनसीवरुन बाबर आझमची (Babar Azam) हकालपट्टी करण्यात येणार असल्याचं वृत्त आलं होतं. त्याच्या जागी मोहम्मद रिझवानची नियुक्ती होणार अशी चर्चा होती. पीसीबीचे सीईओ वासिम खान यांनी ही चर्चा फेटाळली आहे. पण, या आता यापुढील सीरिजमध्ये बाबरच्या कॅप्टनसीवर टांगती तलवार असणार आहे.

टीम निवडीवर कॅप्टन नाराज :  पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझम या टीम निवडीवर खूश नाही. टीमची मिडल ऑर्डर मजबूत करण्यासाठी शोएब मलिकचा समावेश व्हावा यासाठी तो आग्रही होता. मात्र निवड समितीनं वयाचं कारण देत हा आग्रह फेटाळला. त्याचवेळी 40 वर्षांच्या मोहम्मद हाफिजचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

IND vs ENG: मोठी बातमी! रोहित शर्माचा दुखापतीबाबत खुलासा, म्हणाला....

मोहम्मद आमिर करणार पुनरागमन : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरनं बोर्डाशी झालेल्या वादानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र मंगळवारी त्यानं पुनरागमनाची घोषणा केली. आमिरचा कोच मिसबाहशी वाद होता. मिसबाह पदावरुन दूर होताच त्यानं पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे.

टी 20 लीगमधून खेळाडूंना बोलावणे : मोहम्मद हाफिजसह पाकिस्तानचे अनेक खेळाडू कॅरेबियन  प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळत आहेत. त्यांना आता परत बोललण्यात आले आहे. वास्तविक पाकिस्तान बोर्डानं यापूर्वी या सर्वांना ही लीग खेळण्यासाठी एनओसी (NOC) दिला होता.

First published:
top videos