मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी BCCI चा मोठा निर्णय, 4 खेळाडूंना भारतात परत पाठवलं

T20 World Cup: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी BCCI चा मोठा निर्णय, 4 खेळाडूंना भारतात परत पाठवलं

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) होणारी मॅच काही तासांवर आली आहे. त्यापूर्वी बीसीसीआयनं चार खेळाडूंना भारतामध्ये पाठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

inमुंबई, 23 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) होणारी मॅच काही तासांवर आली आहे. टीम इंडिया या मॅचची सध्या जोरदार तयारी करत आहे.  मुख्य फेरीपूर्वी झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या प्रॅक्टीस मॅच भारतीय टीमनं जिंकल्या आहेत. सर्वच खेळाडू पहिल्या मॅचपूर्वी नेटमध्ये जोरदार सराव करत आहेत. तर टीम मॅनेजमेंट या मॅचची रणनीती तयार करण्यात गुंग आहे. या सर्व तयारीत बीसीसीआयनं (BCCI) मोठा निर्णय घेत आयपीएल संपल्यानंतर यूएईमध्येच थांबण्यात आलेल्या चार खेळाडूंना भारतामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर बीसीसीआयनं 8 नेट बॉलर्सना यूएईमध्ये थांबवले होते. यापैकी व्यंकटेश अय्यर, कृष्णप्पा गौतम, शादाब नदीम आणि कर्ण शर्मा या चौघांना भारतामध्ये परत बोलवण्यात आलंय. तर आवेश खान, लुकामन मारीवाला, उमरान मलिक आणि हर्षल पटेल हे चौघे जण वर्ल्ड कप संपेपर्यंत नेट बॉलर म्हणून टीम इंडियाच्या सोबत राहणार आहेत.  भारतामध्ये पाठवण्यात आलेले सर्व खेळाडू पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्यांच्या टीमसाठी उपलब्ध असतील.

भारतामध्ये परत पावण्यात आलेल्या चारपैकी तीन जण स्पिनर आहेत. तर व्यंकटेश अय्यर हा मध्यमगती बॉलर आहे. तर चार फास्ट बॉलर्सना थांवण्यात आलंय. यापैकी उमरान मलिक आणि आवेश खान यांचा स्पीड  भारतीय खेळाडूंना नेटमध्ये सरावासाठी उपयुक्त आहे. लुकामान मारीवाला हा एकमेव डावखुरा बॉलर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडं डावखुरे फास्ट बॉलर्स असल्यानं त्याला थांबवण्यात आलंय. तर यूएईच्या पिचवर हर्षल पटेलची स्लोअर बॉलिंग उपयुक्त असल्यानं त्यालाही थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

T20 World Cup: 135 दिवस मुलीला पाहिलं नाही, मुंबई इंडियन्सच्या दिग्गजानं सोडली टीमची साथ

भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव : श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल

नेट बॉलर्स: हर्षल पटेल, आवेश खान, लुकामन मारीवाला, उमरान मलिक

First published:

Tags: BCCI, Cricket news, T20 world cup