• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup, IND vs NZ: न्यूझीलंडचे 3 अडथळे पार केले तरच टीम इंडियाचा विजय शक्य

T20 World Cup, IND vs NZ: न्यूझीलंडचे 3 अडथळे पार केले तरच टीम इंडियाचा विजय शक्य

आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या 18 वर्षांपासून टीम इंडियाला न्यूझीलंडला (India vs New Zealand) पराभूत करता आलेलं नाही. पराभवाची साखळी तोडण्यासाठी टीम इंडियाला तीन अडथळे पार करावे लागणार आहेत.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर: आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या 18 वर्षांपासून टीम इंडियाला न्यूझीलंडला (India vs New Zealand) पराभूत करता आलेलं नाही. टी20 वर्ल्ड कपमध्ये तर भारतीय क्रिकेट टीमची न्यूझीलंड विरुद्धची विजयाची पाटी अद्याप कोरी आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर अडचणीत आलेल्या टीम इंडियासमोर आता नेहमीच डोकेदुखी ठरणाऱ्या न्यूझीलंडला हरवण्याचं आव्हान आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या बॉलिंग करत नसल्यानं टीमचं संतुलन बिघडलं आहे. हार्दिकच्या फिटनेसाचाही मोठा प्रश्न आहे. फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारचा फॉर्मही सध्या हरपलाय. त्यामुळे योग्य Playing 11 निवडण्याची कसरत टीम मॅनेजमेंटला करावं लागेल. तर मैदानात उतरल्यानंतर न्यूझीलंडचे तीन अडथळे टीम इंडियाला पार करावे लागतील. पहिला अडथळा:  न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं भारताविरुद्ध 11 मॅचमध्ये 325 रन काढले आहेत. या मॅचमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 136 आहे. त्यानं भारतापेक्षा जास्त रन फक्त पाकिस्तानविरुद्ध केले आहेत. न्यूझीलंडच्या कॅप्टनचा टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च 95 स्कोर देखील टीम इंडियाविरुद्ध आहे. भारतीय बॉलर्सना रविवारी विल्यमसनचा अडथळा लवकर दूर करावा लागेल. दुसरा अडथळा:  लेफ्ट आर्म फास्ट बॉलर्स विरुद्ध भारताच्या टॉप ऑर्डरनं नेहमीच संघर्ष केला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) या तिघांनाही पाकिस्तान विरुद्ध शाहीन आफ्रिदीनं आऊट केलं होतं. टॉप ऑर्डरच्या या कमकुवत गोष्टीचा फायदा घेण्यासाठी ट्रेंट बोल्ट (Trent Boult) सज्ज झाला आहे. बोल्टनं आजवर विराटला 6 वेळा, रोहितला 5 वेळा तर राहुलला 1 वेळा आऊट केलं आहे. T20 World Cup, IND vs NZ: विराट कोहलीची कॅप्टनसी पणाला, न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलण्याचं आव्हान तिसरा अडथळा: न्यूझीलंडचा लेग स्पिनर ईश सोधी हा टीम इंडियासमोरचा तिसरा अडथळा आहे. त्यानं मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये विराटला 5 वेळा तर राहुलला 2 वेळा आऊट केलं आहे. त्यानं भारताविरुद्ध 12 मॅचमध्ये 17 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट 7.53 आहे.
  Published by:News18 Desk
  First published: