Home /News /sport /

मोठी बातमी! इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाची एन्ट्री, दिग्गज खेळाडू पॉझिटिव्ह

मोठी बातमी! इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाची एन्ट्री, दिग्गज खेळाडू पॉझिटिव्ह

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) मालिकेच्या संबंधित काही जणांना यापूर्वी कोरोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यापाठोपाठ आता इंग्लंडमधील टी 20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेतही कोरोनाची एन्ट्री झाली आहे.

    लंडन, 3 जुलै : इंग्लंडमध्य्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पेशंट्सची संख्या अजूनही वाढत आहे. क्रिकेट विश्वाला देखील याचा फटका बसला आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) मालिकेच्या संबंधित काही जणांना यापूर्वी कोरोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यापाठोपाठ आता इंग्लंडमधील टी 20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेतही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. या स्पर्धेत बर्मिंगहॅम बिअर्स (Birmingham Bears) टीमकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत ब्रेथवेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर 9 मॅचमध्ये 13.33 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. ब्रेथवेटनं तीन दिवसांपूर्वीच यॉर्कशर विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्याने 2 ओव्हर्समध्ये फक्त 7 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. ब्रेथवेटच्या घातक स्पेलमुळे यॉर्कशरची टीम 81 रनवरच ऑल आऊट झाली. त्यानंतर बर्मिंगहॅम बिअर्सनं हे आव्हान 9 व्या ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पूर्ण केले होते. 'भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी गांगुली निर्णायक ठरणार' ब्रेथवेटची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचे आणखी दोन सामने बाकी आहेत. स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात ब्रेथवेटला कोरोना झाल्यानं त्यांना धक्का बसला आहे. यापूर्वी सेल्मन आणि ससेक्स टीमच्या टॉम क्लार्कलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले काही खेळाडू सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket news, England

    पुढील बातम्या