मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ऑस्ट्रेलिया गाजवून परतलेल्या नटराजननं केलं मुंडन, पाहा PHOTO

ऑस्ट्रेलिया गाजवून परतलेल्या नटराजननं केलं मुंडन, पाहा PHOTO

टीम इंडियाचा फास्ट बॉलर टी. नटराजनसाठी (T. Natarajan) मागील काही महिने हे स्वप्नवत गेले आहेत.  एका दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम नटराजननं केला आहे.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर टी. नटराजनसाठी (T. Natarajan) मागील काही महिने हे स्वप्नवत गेले आहेत. एका दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम नटराजननं केला आहे.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर टी. नटराजनसाठी (T. Natarajan) मागील काही महिने हे स्वप्नवत गेले आहेत. एका दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम नटराजननं केला आहे.

मुंबई, 30 जानेवारी :  टीम इंडियाचा फास्ट बॉलर टी. नटराजनसाठी (T. Natarajan) मागील काही महिने हे स्वप्नवत गेले आहेत. युएईमध्ये मागच्या वर्षी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) स्पर्धेत नटराजननं चांगली कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) खेळताना नटराजननं स्पर्धेत सर्वात जास्त यॉर्कर टाकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून सुरुवातीला निवड झाली होती. मात्र प्रमुख खेळाडू जखमी झाले आणि त्याला मुख्य टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. एकाच दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम नटराजननं केला.

2 डिसेंबर 2020 रोजी कॅनबेरामध्ये नटराजन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच वनडेमध्ये त्याने दोन विकेट घेऊन छाप पाडली. यानंतर त्याने टी-20 सीरिजच्या तीनही मॅच खेळल्या. टी-20 सीरिजमध्ये 6 विकेट घेत नटराजन यशस्वी बॉलर ठरला. त्याचा इकोनॉमी रेटही फक्त 6.91 होता.

वनडे आणि टी-20 सीरिजनंतर नटराजनला नेट बॉलर म्हणून टीमसोबत ठेवण्यात आलं होतं. नटराजन रोज भारतीय बॅट्समनना नेटमध्ये सराव देत होता. पण चौथ्या टेस्टपर्यंत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, अश्विन आणि जडेजा हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, त्यामुळे नटराजनला ब्रिस्बेन टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानं पहिल्याच टेस्टमध्ये 3 विकेट्स घेतल्या.

(वाचा - ‘...म्हणून कांगारू केक कापला नाही,’ उत्तर ऐकून अजिंक्यचा अभिमान वाटेल,पाहा VIDEO)

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टसाठी नटराजनला विश्रांती देण्यात आली आहे. या सुट्टीमध्ये तो गावी परतला असून आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. नटराजनं नुकतंच पलानीमधील लॉर्ड मुरगन मंदिरात (Lord Murugan temple, Palani) दर्शन घेतलं. यावेळी त्यानं मुंडनही केलं. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गावी जंगी स्वागत

ऑस्ट्रेलिया सीरिज जिंकून नटराजन आठवडाभरापूर्वी परतला.  सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी या गावात नटराजनचं अतिशय जल्लोषात स्वागत झालं. इथं त्याच्यासाठी चक्क घोड्याचा रथ आणला होता. या रथावर त्याला मिरवत-मिरवत घरी नेण्यात आलं. यासगळ्या मिरवणुकीत त्याला शेकडो चाहत्यांनी सतत घेरलेलं होतं. नटराजन या रथावर बसून दिमाखात तिरंगा  फडकावत होता. त्याच्या आसपास लोक ढोल आणि नगारे वाजवत अखेरपर्यंत चालत होते.

First published:

Tags: Cricket news