• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • VIDEO: शोएब अख्तरची Live Show मधून पाकिस्तानी अँकरनं केली हकलपट्टी! पाहा संपूर्ण ड्रामा

VIDEO: शोएब अख्तरची Live Show मधून पाकिस्तानी अँकरनं केली हकलपट्टी! पाहा संपूर्ण ड्रामा

पाकिस्तानच्या टीममध्ये मैदानात 'ऑल इज वेल' दिसत असतानाच बाहेर मात्र पाकिस्तानचे खेळाडू वादात सापडत आहेत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) लाईव्ह कार्यक्रमात अँकरनं हकालपट्टी केली.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑक्टोबर: पाकिस्तानची क्रिकेट टीम (Pakistan Cricket Team) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडला पराभूत करुन त्यांनी सेमी फायनलची दावेदारी मजबूत केली आहे. पाकिस्तानच्या टीममध्ये मैदानात 'ऑल इज वेल' दिसत असतानाच बाहेर मात्र पाकिस्तानचे खेळाडू वादात सापडत आहेत. नमाजच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानचा माजी कॅप्टन वकार युनूस (Waqar Younis) याला माफी मागावी लागली आहे. आता आणखी एक फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) वादात सापडला आहे. त्याची पाकिस्तानच्या अँकरनं लाईव्ह शोमधून हकालपट्टी केली. या नाट्यमय घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काय घडले प्रकरण? पाकिस्तानचे न्यूज चॅनल पीटीव्ही (PTV) वरील 'गेम ऑन है' या कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला. या कार्यक्रमात मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्या मॅचवर चर्चा सुरू होती. यामध्ये वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन विवियन रिचर्डसह अनेक माजी खेळाडू सहभागी झाले होते. शोएब अख्तरनं यावेळी लाहोर कलंदर्स या पाकिस्तानच्या फ्रँचायझीकडून खेळणाऱ्या शाहीन आफ्रिदी आणि हॅरीस राऊफची प्रशंसा केली. या टीममुळेच त्यांचा खेळ बहरल्याचा दावा अख्तरनं केला. त्यानंतर या शो चा होस्ट नौमान नियाजनं अख्तरला अडवत शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या अंडर-19 टीमकडून खेळत असल्याची आठवण केली. त्यावर नौमीन यांना अडवत मी हॅरीस राऊफबद्दल बोलत आहे, असं उत्तर अख्तरनं दिलं. अख्तरचं हे उत्तर नियाज यांना आवडलं नाही. त्यांनी लाईव्ह कार्यक्रमातच त्याला अपमानित केले. 'तू थोड्या सभ्यतेनं बोल. मला हे बोलण्याची इच्छा नाही, पण तू स्वत:ला ओव्हरस्मार्ट समजत असशील तर या कार्यक्रमातून निघून जाऊ शकतोस. मी तुला हे ऑन एअर सांगत आहे.' असं सुनावलं. नियाज यांनी त्यानंतर अख्तरच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत इतरांना प्रश्न विचारले आणि कार्यक्रमात ब्रेक घेतला. ब्रेकनंतर अख्तरनं हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला पण, नियाज यांनी त्याकडं लक्ष दिलं नाही. अखेर मी पीटीव्हीमधून राजीनामा देत आहे, असं सांगत अख्तर बाहेर पडला. 'नियाज यांनी नॅशनल टीव्हीवर नॅशनल स्टारचा अपमान केला आहे. तिथं विदेशी खेळाडू देखील बसले होते. मी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत नियाज यांनी माफी मागण्याची मागणी केली. पण त्यांनी दुर्लक्ष केल्यानं मला तिथून निघून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही, असं अख्तरनं सांगितलं. हरभजन-आमिरमध्ये रंगले Twitter War, भज्जीनं करुन दिली स्पॉटफिक्सिंगची आठवण
  Published by:News18 Desk
  First published: