मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम निवडीवर विराटची नाही तर रोहितची छाप, 'या' 3 निवडीमुळे झालं स्पष्ट

T20 World Cup: टीम निवडीवर विराटची नाही तर रोहितची छाप, 'या' 3 निवडीमुळे झालं स्पष्ट

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup 2021) टीम इंडियाची निवड झाली आहे. या टीमचा कॅप्टन हा विराट कोहली (Virat Kohli) असला तरी टीमच्या निवडीवर व्हाईस कॅप्टन रोहित शर्माची (Rohit Sharma) छाप आहे.

मुंबई, 11 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup 2021) टीम इंडियाची निवड झाली आहे. या टीमचा कॅप्टन हा विराट कोहली (Virat Kohli) असला तरी टीमच्या निवडीवर व्हाईस कॅप्टन रोहित शर्माची (Rohit Sharma) छाप आहे. रोहित शर्मा हा टी20 विश्वातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धेचं पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे निवड समितीनं त्याच्या मताला यंदा प्राधान्य दिले आहे. इशान किशन (Ishan Kishan) की शिखर धवन (Shikhar Dhwan) असा निवड समितीसमोर मुख्य पेच होता. यामध्ये निवड समितीनं मुंबई इंडियन्सचा तरुण खेळाडू इशान किशनला प्राधान्य दिलं आहे. इशान किशनची वेगानं रन काढण्याची क्षमता आणि मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्यानं केलेली कामगिरी हे घटक त्यासाठी निर्णायक ठरले. त्याचबरोबर इशानच्या क्षमतेवर रोहित शर्माचा असलेला विश्वास देखील टीम निवडीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरला आहे. इशान किशन प्रमाणेच मुंबई इंडियन्सचा स्पिनर राहुल चहरला (Rahul Chahar) वर्ल्ड कपच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला निवडण्यात आलं आहे. रोहित शर्मानं आयपीएल स्पर्धेत राहुल चहरचा अत्यंत कुशलतेनं वापर केला आहे. रोहितच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या राहुलनं अनेकदा 17 वी आणि 19 वी ओव्हर देखील टाकलेली आहे. दबावात बॉलिंग करण्याच्या राहुलच्या क्षमतेचा मुंबई इंडियन्समध्ये विकास झाला आहे. त्याच्या याच क्षमतेमुळे त्याची आता टीम इंडियात निवड झाली आहे. अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनच्या निवडीमध्येही रोहित शर्माची भूमिका निर्णायक ठरली आहे. अश्विनचं चार वर्षांनी टी20 टीममध्ये आगमन झालं आहे. अश्विनचा अनुभव आणि यूएईमधील पिचवरील त्याचा उत्तम रेकॉर्ड यामुळे रोहितनं अश्विनच्या निवडीचा आग्रह धरला होता. विराटनंही रोहितची ही मागणी मान्य केली. IPL पूर्वी शाहरूख खानच्या टीमचा बोलबाला, पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर धडक यापूर्वी टीम इंडियामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK)  दबदबा होता. आता मुंबई इंडियन्सचा दबदबा आहे. कॅप्टन रोहित शर्मासह हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर हे 6 खेळाडू मुंबई इंडियन्सचे आहेत. निवड समितीचा रोहितच्या टीम निवडीवर असलेल्या विश्वासाचं हे उदाहरण मानलं जात आहे.
First published:

Tags: Cricket news, T20 world cup

पुढील बातम्या