मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: धोनीला मिळाला नवा रोल, पाकिस्तान विरुद्ध होणार टीम इंडियाचा फायदा! पाहा Photos

T20 World Cup: धोनीला मिळाला नवा रोल, पाकिस्तान विरुद्ध होणार टीम इंडियाचा फायदा! पाहा Photos

T20 World Cup 2021: महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Twitter/BCCI)

T20 World Cup 2021: महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Twitter/BCCI)

महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून नियुक्ती झाली आहे. धोनीनं पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 23 ऑक्टोबर: महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून नियुक्ती झाली आहे. धोनीनं पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतला विकेट किपिंगच्या टिप्स दिल्या होत्या. भारताची पहिली मॅच पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) रविवारी होणार आहे.  या मॅचमध्ये पूर्ण तयारीसह उतरण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. याच तयारीचा भाग म्हणून धोनीनं शुक्रवारी झालेल्या नेट सेशनमध्ये नवी भूमिका बजावली.

बीसीसीआयनं धोनीचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यामुळे धोनीला मिळालेला नवा रोल सर्वांना समजला आहे. 'टीम इंडियाला नवा 'थ्रो डाऊन स्पेशालिस्ट' मिळाला. असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलंय. टीम इंडियाकडं  राघवेंद्र, दयानंद आणि नुवान हे तीन जण थ्रो डाऊन स्पेशालिस्ट आहेत. पण शुक्रवारी धोनीनं ही भूमिका बजावत भारतीय बॅटरना मार्गदर्शन केलं.

आयसीसी विजेतेपदाचा आठ वर्षांपासून असलेला दुष्काळ संपवण्याची संधी टीम इंडियाला आहे. या स्पर्धेत उतरण्यापूर्वी हार्दिक पांड्याचा फिटनेस हा एक मोठी समस्या टीम मॅनेजमेंटसमोर आहे. आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये बॉलिंग न करणाऱ्या पांड्यानं दुसऱ्या सराव सत्रामध्येही बॉलिंग केली नाही. त्याचा बॅटींगमधील फॉर्म देखील खास नाही. त्यामुळे त्याच्या अंतिम 11 मधील निवडीबाबत (Playing 11) संभ्रम कायम आहे.

T20 World Cup: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी BCCI चा मोठा निर्णय, 4 खेळाडूंना भारतात परत पाठवलं

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्येही त्यानं फारशी कमाल केली नव्हती. टीम इंडियाकडं हार्दिकला शार्दुल ठाकूरचा पर्याय आहे. शार्दुलनं आयपीएल स्पर्धेत चांगली बॉलिंग केली होती. तसंच त्याची बॅटींग देखील उपयुक्त आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये आजवर 5 मॅच झाल्या आहेत. या सर्व मॅचमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे.

First published: