अबुधाबी, 30 जानेवारी : अबुधाबी (Abu Dhabi) मधील T10 लीग (T10 League 2021) स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची आक्रमक खेळी पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज एव्हिन लुईसनं (Evin Lewis) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये वादळी खेळी केली. या स्पर्धेत दिल्ली बुल्सकडून ( Delhi Bulls) खेळताना फक्त 9 बॉलमध्ये 50 रन काढले. त्यानं एकूण 16 बॉलमध्ये 55 रन काढले. या खेळीच्या दरम्यान त्यानं 7 सिक्स आणि 2 फोर लगावले. याचा अर्थ लुईसनं 55 मधील 50 रन हे फक्त 9 बॉलमध्ये सिक्स आणि फोरच्या मदतीनं पूर्ण केले.
एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स!
लुईसनं मराठा अरेबियन्सच्या (Maratha Arabians) मुख्तार अलीची जोरदार धुलाई केली. लुईसनं त्याच्या एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावले. त्यानं लुईसच्या पहिल्या दोन बॉलवर दोन सिक्स मारले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर दोन रन काढले तर शेवटच्या तीन बॉलवर पुन्हा तीन सिक्स खेचले. त्याच्या या फटकेबाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सनं पाचव्या ओव्हरमध्येच ही मॅच जिंकली.
मराठा अरेबियन्सनं दिल्ली बुल्ससमोर 10 ओव्हरमध्ये 88 रन्स करण्याचं टार्गेट दिलं होतं. मराठाकडून कॅप्टन एम. हुसेननं 35 रनची खेळी केली. T10 मॅचसाठी हे लहान टार्गेट होते. लुईसच्या वादळी बॅटिंगमुळे दिल्ली बुल्सनं फक्त 30 बॉलमध्येच हे टार्गेट पूर्ण केलं.
View this post on Instagram
दिल्ली बुल्सकडून फिडेल एडवर्ड्स आणि अमाद बट्ट यांनी चांगली बॉलिंग केली. बट्टनं 2 ओव्हरमध्ये फक्त 7 रन देऊन 1 विकेट घेतली. तर एडवर्ड्सनंही 2 ओव्हरमध्ये एक विकेट घेताना 15 रन दिले.
मुंबई इंडियन्सनं 2020 साली लुईसला करारमुक्त केलं होतं. आता या आयपीएल ऑक्शनच्या काही दिवस आधी त्यानं वादळी खेळी करत सर्व टीम्सचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket