मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धोनीच्या विश्वासू सहकाऱ्याचा सलग तिसऱ्या दिवशी धमाका, टीम इंडियासाठी दावेदारी मजबूत

धोनीच्या विश्वासू सहकाऱ्याचा सलग तिसऱ्या दिवशी धमाका, टीम इंडियासाठी दावेदारी मजबूत

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) टीममधील प्रमुख खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) सलग तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं असून टीम इंडियासाठी दावेदारी मजबूत केली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) टीममधील प्रमुख खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) सलग तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं असून टीम इंडियासाठी दावेदारी मजबूत केली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) टीममधील प्रमुख खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) सलग तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं असून टीम इंडियासाठी दावेदारी मजबूत केली आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) ऑरेंज कॅपचा मानकरी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या ड्रीम फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत महाराष्ट्राचा (Maharashtra Cricket Team) कॅप्टन असलेल्या ऋतुराजनं सलग तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. ऋतुराजनं ओडिशा विरुद्धच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. त्यानं यापूर्वी तामिळनाडू आणि पंजाबविरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं.

ओडिशा विरुद्ध पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. यश नहार शून्यावर आऊट झाला. या खराब सुरुवातीनंतर ऋतुराजनं केदार जाधवसोबत (Kedar Jadhav) दुसऱ्या विकेटसाठी 131 रनची भागिदारी केली. केदार 35 बॉलमध्ये 55 रन काढून आऊट झाला. तर ऋतुराजनं 47 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 81 रन काढले. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट 172.34 होता. ऋतुराजच्या या खेळीमुळे महाराष्ट्रानं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 183 पर्यंत मजल मारली.

ऋतुराजनं यापूर्वी शुक्रवारी पंजाब विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 54 बॉलमध्ये 80 रन काढले होते. पंजाबनं दिलेलं 138 रनचं आव्हान महाराष्ट्रानं 17.3 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. महाराष्ट्राच्या इनिंगमधील 50 टक्क्याहून जास्त रन ऋतुराजनं काढले. त्यापूर्वी त्यानं तामिळनाडू विरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं.

तामिळनाडूनं दिलेल्या 168 रनचा पाठलाग करताना ऋतुराजनं 28 बॉलमध्ये दमदार अर्धशतक झळकावलं. या खेळीत त्यानं 8 फोर आणि 1 सिक्स लगावला. याचाच अर्थ त्यानं फक्त 9 बॉलमध्ये 38 रन काढले. ऋतुराज अर्धशतकानंतर लगेच 51 रन काढून आऊट झाला.

टीम इंडियाला मिळाला हार्दिक पांड्याचा वारसदार, राहुल द्रविड घेणार मोठा निर्णय?

आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2020 च्या अखेरच्या तीन मॅचमध्ये ऋतुराजने अर्धशतकं केली होती. यानंतर आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने 88*, 38, 40, 45 आणि 101* रनची खेळ केली. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर-1 मध्ये ऋतुराजने 70 रन केले आणि चेन्नईला फायनलमध्ये पोहोचवलं. त्यानं सपूर्ण स्पर्धेत 43.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 रन केले.

आयपीएल पाठोपाठ सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्यानं हा फॉर्म कायम ठेवला आहे. त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी करत टीम इंडियासाठीची दावेदारी मजबूत केली आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर लगेच 17 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand)  यांच्यातील टी20 सीरिज सुरू होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धा खेळलेल्या प्रमुख खेळाडूंना या सीरिजमध्ये विश्रांती मिळू शकते. त्या पार्श्वभूमीवर ऋतुराजची टीममधील निवड निश्चित मानली जात आहे.

First published:

Tags: Cricket news, महाराष्ट्र