अहमदाबाद, 30 जानेवारी : तामिळनाडूनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 (Syed Mushtaq Ali Trophy 2021) स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या लढतीमध्ये त्यांनी राजस्थानचा सात विकेट्सनं एकतर्फी पराभव केला. राजस्थाननं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 154 रन केले. विजयासाठी आवश्यक असलेलं टार्गेट तामिळनाडूनं 18.4 ओव्हर्समध्ये फक्त 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. अरुण कार्तिक (Arun Karthik) हा तामिळनाडूच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं 54 बॉलमध्ये 89 रनची आक्रमक खेळी केली. कॅप्टन दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) 17 बॉलमध्ये 26 रन काढले. एन. जगदीशननं 28 रनची खेळी केली.
यापूर्वी राजस्थानकडून कॅप्टन अशोक मनेरियानं 32 बॉलमध्ये 51 रन काढले. अर्जित गुप्तानं 35 बॉलमध्ये 45 रनची खेळी केली. या दोघांच्या प्रयत्नानंतरही राजस्थानला मोठा स्कोअर उभा करण्यात अपयश आलं. चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळणाऱ्या साई किशोरनं 4 ओव्हर्समध्ये फक्त 16 रन देत 2 विकेट्स घेतल्या. एम. मोहम्मदनं 24 रन देत 4 विकेट्स घेतल्या.
155 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या तामिळनाडूची सुरुवात खराब झाली. हरी निशात फक्त 4 रन काढून आऊट झाला. बाबा अपराजित देखील 2 रन काढून परतला. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या एन. जगदीशन देखील मुक्तपणे फटकेबाजी करु शकत नव्हता.
या अवघड परिस्थितीमध्ये अरुण कार्तिकनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यानं जगदीशनसोबत तिसऱ्या विकेट्ससाठी 52 रनची पार्टरनरशिप केली. त्यानंतर दिनेश कार्तिक सोबत नाबद 89 रनची पार्टनरशिप करत टीमला विजय मिळवून दिला.
Tamil Nadu march into the final! 👍👍
The @DineshKarthik-led unit beat Rajasthan by 7⃣ wickets to seal a place in the summit clash. 👏👏 #TNvRAJ #SyedMushtaqAliT20 #SF1 | @TNCACricket Scorecard 👉 https://t.co/Y5DkQ6696D pic.twitter.com/XSDihUgY3E — BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2021
सात वर्ष IPL पासून दूर
अरुण कार्तिक हा तामिळनाडूच्या सर्वात विश्वासू बॅट्समनपैकी एक आहे. त्यानं आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून 17 मॅच देखील खेळल्या आहेत. मात्र मागच्या सात वर्षांपासून तो या स्पर्धेत खेळलेला नाही. तो 2013 साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध शेवटची मॅच खेळला होता. आता या धडाकेबाज इनिंगनंतर आयपीएल टीमचं लक्ष त्याच्याकडं जाईल, अशी आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket