Home /News /sport /

हॉटेलमधील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह! तीन टीमना धोका, BCCI चं टेन्शन वाढलं

हॉटेलमधील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह! तीन टीमना धोका, BCCI चं टेन्शन वाढलं

चेन्नईच्या (Chennai) लिला हॉटेलमध्ये ‘प्लेट गटा’तील तीन टीम उतरल्या होत्या. त्या हॉटेलमधील जवळपास 20 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानं BCCI चं टेन्शन वाढलं आहे.

    चेन्नई, 5 जानेवारी : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारतामधलं देशांतर्गत क्रिकेट मार्च 2020 पासून बंद आहे. कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं (South Africa) भारताचा दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर भारतात एकही क्रिकेटची मोठी स्पर्धा झालेली नाही. आता नव्या वर्षात नव्या तयारीनं क्रिकेट स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयनं (BCCI) घेतला आहे. बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धा होणार आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021) या स्पर्धेसाठी सर्व टीम आता क्वारंटाईन राहण्यासाठी हॉटेलमध्ये दाखल झाल्या आहेत. चेन्नईच्या (Chennai) लिला हॉटेलमध्ये ‘प्लेट गटा’तील तीन टीम उतरल्या होत्या. त्या हॉटेलमधील जवळपास 20 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानं BCCI चं टेन्शन वाढलं आहे. कोणत्या टीमना धोका? चेन्नईच्या लिला हॉटेलमध्ये मेघालय, मणिपूर आणि मिझोराम या तीन राज्यांच्या क्रिकेट टीम उतरल्या होत्या. या सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट आता करण्यात आली आहे. सर्व खेळाडू हे हॉटेलमधील बायो बबलमध्ये सुरक्षित असून त्यांना कोणताही धोका नाही, असं तामिळनाडू क्रिकेट बोर्डानं (TNCA) स्पष्ट केलं आहे. (हे वाचा-Video: धोनीच्या मुलीची पाचव्या वर्षी पहिली जाहिरात, वडिलांसोबत नवी इनिंग सुरु!) 'घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. सर्व टीमचे खेळाडू आणि क्रिकेट स्पर्धेशी संबंधित सर्व मंडळी पूर्णपणे सुरक्षित आहेत. या हॉटेलमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी खरी आहे, पण ते सर्व कर्मचारा बायो बबलच्या बाहेरचे होते. सर्व खेळाडू हे बायो बबलमध्ये असून त्यांच्या रुममध्ये सुरक्षित आहेत,' असं तामिळनाडू क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या टीमनं केली जेवणाची तक्रार यापूर्वी मुंबईच्या टीमनं हॉटेलमधील जेवणाची तक्रार अधिकाऱ्यांकडं केली आहे. मुंबईच्या टीमची बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. तेथील जेवणावर मुंबईची टीम समाधानी नाही. मुंबईसह दिल्लीच्या टीमनं याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर हॉटेलनं मुख्य शेफला सूचना देऊन या प्रकरणावर तोडगा काढल्याची माहिती आहे. (हे वाचा-IND vs AUS: न्यूझीलंडच्या फॅननं स्टीव्ह स्मिथला केलं ट्रोल, झळकवला हा बोर्ड) मुश्ताक अली स्पर्धेचा कार्यक्रम सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेला 10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा होणार असून एकूण सहा राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket

    पुढील बातम्या