टीम इंडियामध्ये निवड न झालेल्या सूर्यकुमारला सचिनने केला होता मेसेज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) मध्ये निवड न झाल्यामुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) निराश झाला होता, पण त्याला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने मेसेज केला होता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (Team India) मध्ये निवड न झाल्यामुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) निराश झाला होता, पण त्याला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने मेसेज केला होता.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात केलेल्या दिमाखदार कामगिरीमुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चर्चेत राहिला. सूर्यकुमारने मुंबई (Mumbai Indians) ला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सूर्यकुमारच्या या कामगिरीमुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये निवड होईल, असं बोललं जात होतं. सूर्यकुमारलाही याबाबत विश्वास होता, पण त्याच्या पदरी निराशा आली. सूर्यकुमारला संधी न मिळाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे सूर्यकुमार यादव निराश झाला होता, पण त्याला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने मेसेज केला होता. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सूर्यकुमार यादवने याबाबत सांगितलं. 'सचिन तेंडुलकरने मेसेज करून मला विश्वास दिला. जर तू इमानदार असशील आणि खेळासाठी समर्पित असशील तर खेळ तुझ्यानंतर असेल. ही तुझी शेवटची अडचण असू शकते. भारताकडून खेळण्याचं तुझं स्वप्न जवळ आहे. खेळावर लक्ष दे आणि स्वत:ला क्रिकेटसाठी समर्पित कर,' असं सचिन सूर्यकुमारला म्हणाला. आयपीएलच्या या मोसमात सूर्यकुमारने मुंबईसाठी 16 मॅचमध्ये 145.01 च्या स्ट्राईक रेटने 480 रन केले. ज्या दिवशी टीम इंडियाची निवड झाली तेव्हा आपलं नाव नसल्याचं लक्षात आल्यानंतर निराश झाल्याचं सूर्यकुमारने सांगितलं. टीमची घोषणा झाली तेव्हा मी जिममध्ये ट्रेनिंग करत होतो. ट्रेनिंगनंतर मी रात्रीचं जेवण केलं, त्यावेळी मी कोणाशीही बोललो नाही, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published: