Home /News /sport /

सूर्या झाला आमिर, पृथ्वी बनला सलमान! 'अंदाज अपना अपना' पाहून 'गर्लफ्रेंड' म्हणाली... VIDEO

सूर्या झाला आमिर, पृथ्वी बनला सलमान! 'अंदाज अपना अपना' पाहून 'गर्लफ्रेंड' म्हणाली... VIDEO

टीम इंडियाचे बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. या दोघांनी क्वारंटाईन कालावधीमध्ये एक धमाल व्हिडीओ तयार केला आहे.

  मुंबई, 12 ऑगस्ट : टीम इंडियाचे बॅट्समन सूर्यकुमार यादव  (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. मात्र ते दुसऱ्या टेस्ट मॅचमधील  (IND vs ENG) टीमचे सदस्य नाहीत. यातचं कारण म्हणजे ते दोघंही सध्या क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. या क्वारंटाईन कालावधीच्या दरम्यान दोघेही धमाल करत आहेत. हे दोघे इंग्लंड दौऱ्यावर निवडलेल्या टीमचे सदस्य नव्हते. पण, इंग्लंड दौऱ्यावरील शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान जखमी झाल्यानं टीम मॅनेजमेंटच्या मागणीनंतर त्यांना इंग्लंडमध्ये पाठवण्यात आलंय. सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांनी क्वारंटाईन कालावधीमधील एकटेपणा दूर करण्यासाठी धमाल युक्ती केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या दोघांनी प्रसिद्ध हिंदी चित्रपट 'अंदाज अपना अपना' या सिनेमातील डायलॉग म्हंटले आहेत. या व्हिडीओत पृथ्वी शॉ सलमान खानचे  (Salman Khan) तर सूर्यकुमार यादव आमिर खानचे (Aamir Khan) डायलॉग म्हणत आहेत. त्यांचा हा मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून पृथ्वी शॉची 'कथित गर्लफ्रेंड' प्राची सिंहची (Prachi Singh) प्रतिक्रिया आता चांगलीच लक्षवेधी ठरली आहे.
  प्राची सिंहनं हा अभिनय कुणाकडून शिकला आहे? असा प्रश्न विचारला आहे. प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ यांच्यातील नातेसंबंधावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण त्यांच्यातील रिलेशनशिपची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. IND vs ENG : सौरव गांगुली लॉर्ड्सवर दाखल, रवी शास्त्रीच्या भवितव्याचा होणार फैसला पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे दोघं जण सध्या 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. त्यामुळे ते लॉर्ड्स टेस्टमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. पण, तिसऱ्या टेस्टपासून ते टीम इंडियात दाखल होतील.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Prithvi Shaw, Suryakumar yadav

  पुढील बातम्या